शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

‘शिवोत्सवा’त तरुणाई आजपासून रंगणार

By admin | Updated: February 10, 2017 00:28 IST

शिवाजी विद्यापीठ सजले : देशभरातील विद्यार्थी कलाकारांच्या स्वागतासाठी सुरू आहे लगबग

कोल्हापूर : ‘शिवोत्सव’ या ३२ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात आज, शुक्रवारपासून पाच दिवस देशभरातील तरुणाईचा कलाविष्कार बहरणार आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठ सजले आहे. महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी विद्यापीठात तयारीची लगबग सुरू होती.केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालय, भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘शिवोत्सव’ हा लोकनृत्य, पाश्चिमात्य नृत्य, संगीत, वादविवाद, एकांकिका, लोककला, आदी प्रकारांमध्ये रंगणार आहे. त्यात देशभरातील ८० हून अधिक विद्यापीठांमधील सुमारे १३०० विद्यार्थी कलाकार भारतीय कला-संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. महोत्सवाचा प्रारंभ आज, शुक्रवारी दुपारी तीन वाजता सहभागी संघांच्या शोभायात्रेने होणार आहे. विद्यापीठाची मुख्य इमारत, मुलींचे वसतिगृह, सायबर चौक, माऊली चौक, चांदीचा गणपती मंदिर (शाहूनगर), प्रतिभानगर, मालती अपार्टमेंट, एनसीसी भवन ते लोककला केंद्र असा शोभायात्रेचा मार्ग आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता लोककला केंद्रात महोत्सवाचे उद्घाटन शाहू छत्रपती, चित्रपट अभिनेते सचिन खेडेकर, ‘एआययू’चे सहसचिव डॉ. डेव्हिड सॅम्पसन, प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. दरम्यान, विद्यापीठाकडून गुरुवारी स्वागतकमान उभारणी, मुख्य इमारतीची रंगरंगोटी-स्वच्छता, महोत्सवाचे उद्घाटन, विविध सभागृह, खुला मंच सज्जतेची तयारी वेगाने सुरू होती. रात्री उशिरापर्यंत तयारीची लगबग सुरू होती. महोत्सवातील सहभागी संघांच्या स्वागतासह त्यांना विद्यापीठात आणण्यासाठी रेल्वे स्थानकापासून एनएसएसचे स्वयंसेवक, विद्यापीठातील कर्मचारी कार्यान्वित होते. आकर्षक विद्युत रोषणाईने विद्यापीठाची मुख्य इमारत झळाळून निघाली होती. प्रभारी कुलगुरु डॉ. डी. आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव आदींनी पाहणी केली. (प्रतिनिधी) परिसरात फेरफटका, तालीम रंगलीया महोत्सवासाठी गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत ६९ विद्यापीठांच्या संघांनी नोंदणी केली. सकाळी दहा वाजल्यापासून विद्यापीठात संघांचे आगमन होऊ लागले. दिवसभरात मणिपूर, चेन्नई, अमृतसर, म्हैसूर, पद्मावती युनिव्हर्सिटी, कुरूक्षेत्र विद्यापीठ, तेजपूर, कालिकत युनिव्हर्सिटी, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, नागपूर विद्यापीठ आदी संघ दाखल झाले. विद्यापीठात दाखल झालेल्या संघांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी निवासाच्या ठिकाणी साहित्य ठेवल्यानंतर परिसरात फेरफटका मारला. काहींंची निवास व्यवस्थेच्या ठिकाणी तालीम रंगली होती.