शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू; नायगांव तालुक्यातील भोपाळा येथील दुर्दैवी घटना

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: September 9, 2022 19:25 IST

नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क नायगांव

नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की दर वर्षी प्रमाणे याहीवर्षी  बसवण्यात आलेल्या सार्वजनिक युवा गणेश मंडळ गणपतीचे विसर्जन करण्यासाठी दि.९ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पाझर तलावात गणपतीला सोडन्यासाठी पाण्यात उतरलेल्या शिवकुमार बाबुराव हत्तीनगरे वय  20 वर्ष या तरुण युवकाचा पाझर तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यातील गाळात बसून तो पाण्यात अडकल्याने गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुण युवकाची एकच धांदल उडाली होती. गणपती सोडण्यासाठी गेलेला तरुण युवक पाण्यात फसला ह्या घटनेची माहिती माजी सरपंच आनंदराव पाटील बावणे यांनी रामतीर्थ पोलिस व तहसील प्रशासनाला कळवली.  रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी संकेत दिघे यासह पोलीस कर्मचारी व नायगाव तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे, तलाठी विजय पाटील यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाण्यात फसलेल्या युवकाला पाण्याबाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न केले परंतु अनेकांना तो हाताला लागत नसल्याने हनमंत हत्तीनगरे, बाबुराव हातीनगरे, व्यंकट हातीनगरे , आनंदा मष्णाजी कोठेवाढ यांनी गळाच्या साह्याने पाण्यात फसलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यशस्वी झाले परंतु तब्बल दीड तास पाण्यात अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

सदरील घटनेचा रामतीर्थ पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले असून या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे भोपळा व शंकर नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवकुमार हत्तीनगरे हा एकुलता एक मुलगा होता तो शंकरनगर येथील गोदावरी मनार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता त्यांच्या या अकाली निधनामुळे आई वडिलांचा आधार गेला असून त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलास शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात