शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
4
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
5
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
6
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
7
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
8
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
10
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
11
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
12
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
13
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
14
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
15
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
16
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
17
Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
18
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
19
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
20
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: September 22, 2016 20:50 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमतजत, दि. २२ : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उटगी (ता. जत) येथील बाळासाहेब लक्ष्मण चव्हाण (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे लिहिले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

उटगी येथे बाळासाहेब चव्हाण व त्यांचा लहान भाऊ दिलीप (३५) यांची वडिलोपार्जित १५ एकर जिरायत शेतजमीन आहे. बाळासाहेब यांचे आठवीपर्यंत शिक्षण झाले होते. पत्नी वैशाली, आई सुसाबाई, दोन मुले राघवेंद्र (८ वर्षे) व लक्ष्मण (१२) यांच्यासोबत ते भावापासून विभक्त राहत होते. त्यांच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. उटगीपासून दीड किलोमीटरवर त्यांची शेतजमीन आहे. तीन दिवसांपूर्वी, नातेवाईकांना भेटायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे त्यांची बहीण आहे. बहिणीजवळ त्यांनी एक दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आणखी काही नातेवाईकांना भेटण्यासाठी ते गेले होते. बुधवारी सायंकाळी, उटगीला जात असल्याचे सांगून ते नातेवाईकांच्या घरातून बाहेर पडले होते. रात्री ते जतला आले. त्यानंतर जत-वळसंग रस्त्यावरील केंचराया मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुरुवारी सकाळी जतमधील काही लोक मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये चव्हाण गळफासाने लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लोकांनी जत पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून याची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून चव्हाण यांचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. चव्हाण यांच्या पिशवीतील साहित्यामध्ये त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आक्रोश करीत आले. जत आणि वळसंगमधील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चव्हाण कुटुंबप्रमुख होते, पण त्यांनीच आत्महत्या केल्याने या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन तपासणी करुन दुपारी चव्हाण यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मच्छिंद्र बाबर यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.आरक्षण द्यावेचव्हाण यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात चिठ्ठी लिहिली आहे. ह्यमराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, पत्नी व मुलांचा व्यवस्थित सांभाळ करावाह्ण, असा मजकूर चिठ्ठीत आहे. चव्हाण यांचा मुलगा राघवेंद्र पाचवीत, तर लक्ष्मण आठवीत शिकत आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. रात्री उशिरा उटगी येथे त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले.पहिलीच घटनामराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजाचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. गेल्या पंधरवड्यापासून तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढले जात आहेत. सोलापुरात बुधवारीच मोर्चा काढला होता. चव्हाण बुधवारी सोलापुरातच होते, अशी माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे. सांगलीत २७ सप्टेंबरला मोर्चा निघणार आहे. आरक्षणासाठी चव्हाण यांनी केलेली आत्महत्या, ही राज्यातील पहिलीच घटना आहे.