शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीच्या ‘वसुली’ला कंटाळून तरुणाची आत्महत्या; उस्मानाबादमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 08:43 IST

पंचांच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

उस्मानाबाद : मेहुणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जात पंचायतीने २ लाख रुपयांचा दंड करून त्याच्या वसुलीसाठी तगादा लावल्याने उस्मानाबादेतील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमनाथ छगन काळे असे या तरुणाचे नाव आहे. जात पंचायतीच्या पंचांना 

अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी ठिय्या दिला होता. उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व सध्या उस्मानाबाद शहरात वास्तव्यास असलेल्या सोमनाथ काळे याचे त्याच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरविली होती. त्यात सोमनाथला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंड वसूलदेखील केला. मात्र, उर्वरित १ लाख ८० हजार रुपये वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे तगादा लावला होता. हे पैसे देण्यास विलंब केल्यास घृणास्पद शिक्षेला सामोरे जावे लागेल, अशी धमकी त्यास सातत्याने देण्यात येत होती. याच त्रासाला वैतागून सोमनाथ व त्याच्या पत्नीने २२ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सोमनाथची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास सोलापूरला हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी सोमनाथचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले.

याप्रकरणी जात पंचायतीच्या पंचांवर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नातेवाईकांनी मृतदेहासह आक्रोश केला. अखेर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तहसीलदार गणेश माळी यांनी, संबंधितांवर गुन्हे दाखल करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. 

घडलेली ही घटना निंदनीय आहे. यामागे जात पंचायतीचा दबाव असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी २०१७ मध्ये सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा बनविला आहे. त्या कायद्यांतर्गत जात पंचायतीच्या पंचांवर गुन्हे दाखल व्हावेत व तत्काळ अटक व्हावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.  पीडित परिवाराचे पुनर्वसन होण्याची गरज आहे - कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जात पंचायत मूठमाती अभियान

टॅग्स :Policeपोलिस