शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

आपले महावितरण आपली जबाबदारी; वीजबिल भरण्यासाठी राबविणार प्रचार मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 11:55 IST

लॉकडाऊन काळात एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ६४ लाख ५२ हजार इतकी आहे.

पिंपरी : वीजबिल थकबाकी वाढल्याने महावितरणसमोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. ग्राहकांनी वीजबिल भरावे, यासाठी कामगार संघटना मदतीला धावल्या आहेत. त्यांनी ह्यआपले महावितरण आपली जबाबदारीह्ण या अंतर्गत प्रचार मोहीम हाती घेतली आहे.टाळेबंदी (लॉकडाऊन) नंतर वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर महावितरणसमोर उभा राहिला आहे. लॉकडाऊन काळात एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ६४ लाख ५२ हजार इतकी आहे. त्यामुळे दैनंदिन संचलन करण्यातही महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे वीजबिल भरणा मोहीम हाती घ्यावी लागत आहे.

महावितरणमुळेच टाळेबंदी असूनही अखंडित सेवा दिली. त्यामुळे आपण घरात टीव्ही पाहू शकलो, तसेच घरून काम करणेही त्यामुळेच शक्य झाले. कोरोनाकाळात सेवा देताना अनेक विद्युत कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यानंतरही सेवेमध्ये खंड पडला नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे वीज यंत्रणा कोलमडली. तेव्ही हेच वीज कर्मचारी आपल्या गावापासून दूर अंतरावर वीज सेवा सुरळीत करण्यासाठी झटत होते. वीज कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करून नियमित वीज भरण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.--------

केबल, मोबाईल शुल्क माफ झाले का?, मग वीज मोफत का?कोरोना काळात नागरिकांना केबल टीव्ही, मोबाईल, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर मोफत मिळाला का ? मग वीज मोफत मिळेल अशा प्रचाराला बळी का पडता, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना काळात चोवीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------कंपनी जगली तर कामगार जगणार आहे. त्यामुळे ही मोहीम हाती घेतली आहे. ऊर्जामंत्र्यांनी मोफत वीजेबाबत घोषणा केल्याने अनेकांनी वीज माफीच्या अपेक्षेने बिल भरले नाही. आता हा मुद्दा राजकीय झाला आहे. मात्र, नागरिकांनी आश्वासनांना न भुलता वीजबिल भरावे.

नीलेश खरात, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ----------

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरणcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारNitin Rautनितीन राऊत