शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल; जरांगे पाटलांचे भुजबळांना जशास तसे प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 18:25 IST

शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. - जरांगे पाटील

हिंगोलीतील ओबीसी एल्गार सभेमध्ये छगन भुजबळ यांनी शिंदे समिती रद्द करण्याची मोठी मागणी केली, तसेच गेल्या दोन महिन्यांत देण्याची आलेली कुणबी प्रमाणपत्रे देखील रद्द करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली होती. यावर आजा जरांगे पाटलांनी प्रत्यूत्तर दिले आहे. 

शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीवर त्यांना वाटतेय आपली तर दहशत आहे. असो वयोमानानुनार होत असते. त्यांचे केस पांढरे होऊन काय फायदा झाला. कायद्याच्या पदावर बसायचे आणि असली भाषा बोलायची. त्यांना चांगले माहीत आहे त्यांनी काय काय खुंट्या ठोकून ठेवल्यात त्या, आता आम्हीही खुंट्या तयार ठेवल्या आहेत, असा इशारा पाटलांनी दिला आहे.

जोडायला अक्कल लागते हे आधीच त्यांना कळायला हवे होते. मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेऊन ठेवले, हे त्यांना कळायला हवे होते. गावबंदी हटाववरून त्यांना पदाचा गैरवापर करायचा आहे का असा सवाल करत लोक गावात येऊ नका हे हक्काने सांगतायत. यांना हक्क कळतो का, असा सवाल भुजबळ यांना केला. तसेच तुम्ही अटक का केली याच कारण सांगा. आमच्या लोकांचं काय चुकलं? तुम्हाला काय बोलावे हेच कळत नाहीय. समाज मला काय कुणालाही पडताळून बघू शकत नाही. महाराष्ट्रातील मराठा समाज आमचा नाही हे मी म्हणू शकत नाही. फक्त मराठा आरक्षणाचा कायदा सांगा दुसरे सांगू नका, असे जरांगे पाटील म्हणाले. 

आमच्या लोकांनी मार खाल्ला. पोलिसांनी त्यांना गोळ्या मारल्या. यांचे केस असेच पांढरे झालेत का, तुम्ही असेच पांढरे झाले का? जाती जातीत द्वेष पसरवतायत असा आरोप करत जरांगे पाटलांनी  शिव्या देणाऱ्या लोकांचं मी समर्थन करत नाही कुणी त्यांच्या अंगावर जाऊ नये, असा सल्ला दिला. तसेच यांना कुठे झुंडशाही दिसली. त्यांचेच पाहुणे आहेत हॉटेल जाळणारे पण हे लोकांवर ढकलतात असा आरोप जरांगे यांनी केला. 

आमचे आरक्षण रद्द झाले तर तुमचे ऑटोमॅटिक रद्द होईल, कारण ओबीसींच्या शासकीय नोंदी नाहीत. तुम्ही ओबीसी आणि मागास नाही, आम्हाला कुणीही बाहेर काढू शकत नाही.  मी दिवस रात्र सांगतोय, ओबीसी मराठा यांनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही. बोर्ड काढा हे त्यांचे आवाहन जातीयवादी नाही तर काय आहे. मी पाय तोडून घ्यायला तयार, पण आरक्षण मिळवूनच दाखवणार आहे. या सभेला त्यांनी दंगल सभा नाव द्यायला हवे. ते पांढरे झाले जुनाट नेते आहेत, असा टोला जरांगे पाटलांनी तायवाडे यांना लगावला. 

मी आता त्यांना संताजी धनाजीसारखा दिसत आहे. कितीही दंगली भडकवण्याचा प्रयत्न करूद्या. मराठ्यांनी शांतपणे आंदोलन करावे. जुन्या नेत्यांना मी सल्ले देत नाही. खोट्या केसेसचा त्रास सहन करा, पण शांत बसा. शांतपणे सहन करा, एकजूट वाढवा, आपण आरक्षण घेऊच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण