विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘तो’ तरुण पॅलेस्टिनी निर्वासित

By admin | Published: October 12, 2014 02:02 AM2014-10-12T02:02:09+5:302014-10-12T02:02:09+5:30

औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या पॅलेस्टिनी निर्वासित तरुणाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाने प्रशासन चांगलेच हादरले आहे.

The young Palestinian exiled who 'oppressed' the student | विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘तो’ तरुण पॅलेस्टिनी निर्वासित

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘तो’ तरुण पॅलेस्टिनी निर्वासित

Next
>जळगाव : औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या पॅलेस्टिनी निर्वासित तरुणाने  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाने प्रशासन चांगलेच हादरले आहे. विद्यापीठात संशोधनासाठी आलेल्या इराणच्या विद्यार्थिनीने त्याची येथील विद्यार्थिनींशी ओळख करून दिली होती. दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही झाली आहे.
गुन्हा दाखल झालेली व विद्यापीठात संशोधन करीत असलेली इराणची परविन बिरगोनी ही नेपाळमधील एका कॉलेजची विद्यार्थिनी असून, ती आतार्पयत चार वेळा शिक्षक भवनात थांबल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर अला अब्दुल हा पॅलेस्टिनी निर्वासित असून, तो 2क्क्3 पासून भारतात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
अटकेतील आरोपी परविन बिरगोनी ही काठमांडू येथील परामर्श मनोविज्ञान व सामाजिक अध्ययन कॉलेज, बुद्धनगर येथील विद्यार्थिनी आहे. मानसशास्त्र विषयाची विद्यार्थिनी असलेली परविन पुणो, औरंगाबाद आणि नंतर जळगावात दाखल झाल्याची माहिती आहे.
परविनकडे दोन पासपोर्ट
परविनकडे इराणचे दोन पासपोर्ट आढळले. त्यात ई-14259733 हा परविन वेसी बिरगोनी शहा हुसेन या नावाचा आहे. त्याची मुदत 3 सप्टेंबर 2क्क्8 ते 4 सप्टेंबर 2क्13 र्पयत होती. दुसरा पासपोर्ट इस्लामिक रिपब्लिकन इराण येथील बी-27182367 हा पारसी परविन शहा हुसेन या नावाने आहे. या पासपोर्टची मुदत 2क् जुलै 2क्13 ते 2क् जुलै 2क्18 अशी आहे. तिच्याकडे पुणो येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे पासबुक आणि एव्हरेस्ट बँक, नेपाळशी संलग्न केलेले पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम कार्ड मिळाले आहे.
 
च्अला अब्दुल मोहंमद रहिम हा पॅलेस्टिन जवळच्या गाजापट्टीतून निर्वासित म्हणून बाहेर पडला आहे. निर्वासित असल्याने त्याला युनिसेफने विशेष कार्ड पुरविले आहे. त्या आधारावर तो जगातील कोणत्याही देशात वास्तव्य करू शकत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
च्2क्क्3 मध्ये तो भारतात आला. औरंगाबाद येथील हैद्रा कॉम्प्लेक्स, मसानी चौक, सिडको येथे तो दोन भावांसोबत राहतो. आतार्पयत तो येमेन, सौदी अरेबियातही काही काळ राहिला. त्याचे वडील अभियंता असून, ते महिन्याला ठरावीक रक्कम त्याच्या खात्यावर पाठवित असल्याचे तो सांगतो. पोलिसांनी त्याच्याकडून पासपोर्ट, युनिसेफचे कार्ड जप्त केले आहे.
 
दुभाषक - गाइडचे काम
अला अब्दुल औरंगाबादमध्ये विदेशी नागरिकांसाठी दुभाषकाचे काम करतो.  इंग्रजी, हिंदी, उर्दू व फ्रेंच भाषेचे त्याला चांगले ज्ञान असल्याने तो भाषांतराचे देखील काम करतो. सर्वसाधारण परिस्थितीतील अला अब्दुल तरुणींना महागडय़ा हॉटेलात नेणो व भेटवस्तूंसाठी कोठून पैसे आणत होता. त्याला हा पैसा कोण पुरवित होता, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या बँक खात्यांची माहिती मागविली आहे. 

Web Title: The young Palestinian exiled who 'oppressed' the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.