शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:54 AM

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

ठळक मुद्देबारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे

बारावी विज्ञान शाखेनंतर काय? प्रत्येक विद्यार्थी, आईवडिलांना पडलेला प्रश्न. त्यातच अभियांत्रिकीत प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक पालकाला वाटते की, आपल्या पाल्याने संगणक शाखेतून अभियांत्रिकीची पदवी मिळवावी व एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी. परंतु सध्या ती परिस्थती राहिलेली नाही. आपल्या पाल्याच्या करिअरचा विचार करून सर्व पालकांनी थोडे कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे.

बारावी पास करून अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाºया पाल्याला ‘जेईई मेन’मध्ये चांगले मार्क्स मिळाले असतील तर, अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे; परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत. महाराष्टÑात वसलेल्या या भारतातील एकमेव शिक्षण संस्थेचा फायदा इतर राज्यांतील विद्यार्थीच जास्त घेत असून, आजमितीस शिक्षण पूर्ण केलेले हे सर्व विद्यार्थी उच्च पद भूषवित आहेत किंवा मोठ्या पगाराच्या नोकºया अथवा व्यवसाय करीत आहेत.भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर (एनएफएसी) या महाविद्यालयात अग्नी विषयात इंजिनीअरिंगची पदवी (इ.ए. - ऋ्र१ी) हा चार वर्षांचा पाठ्यक्रम १९७८ पासून चालवला जातो. या पाठ्यक्रमाला (अकउळए) ची मान्यता असूनही प्रशिक्षण संस्थेशी (फळटठव) संलग्न आहे. या पाठ्यक्रमाच्या सहाव्या बॅचची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करता येतील. या पाठ्यक्रमाला दरवर्षी ६० जणांना ‘जेईई मेन’च्या सी.आर.एल. रँकवरून प्रवेश दिला जातो. याव्यतिरिक्त शारीरिक मोजमापे योग्य असणेही प्रवेशासाठी आवश्यक आहे.चार वर्षे जरी प्रशिक्षण संस्थेत राहावे लागत असले तरी पाठ्यक्रम पूर्ण होताच कॅम्पसच्या मुलाखतीत मुलांना बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळते.नोकरीव्यतिरिक्त अग्निशमनच्या यंत्रसामग्रीतही व्यवसाय करायला भरपूर वाव असून, इ.ए. - ऋ्र१ी ही पदवी मिळाल्यानंतर या विषयात पीएच.डी. करून सेंट्रल बिल्डिंग रीसर्च इन्स्टिट्यूट (उइफक), रुरकीसारख्या ठिकाणी वैज्ञानिक म्हणून काम करू शकतो. परंतु पदवी घेतलेले बरेच विद्यार्थी नोकरी हाच पर्याय निवडतात व पुढील काळात स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरणाचे मान्यताप्राप्त छोट्या कालावधीचे पाठ्यक्रम पूर्ण करून आपल्या करिअरला झळाळी देऊन स्वास्थ्य, सुरक्षा व पर्यावरण विभागाच्या उच्च पदावर विराजमान होतात. सर्वच राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपनीत या विभागाला फार महत्त्व असून नोकरीच्या भरपूर संधी देश-विदेशात, जास्त करून आखाती देशात उपलब्ध आहेत.

(लेखक मुंबई अग्निशमन दलाचे माजी अधिकारी आहेत.)सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांनी करिअरसाठी कक्षेबाहेर डोकावणे गरजेचे आहे. अग्नी विषयात अभियांत्रिकीची पदवी घेऊन एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविणे हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु याबाबत आपण शहरवासीय - महाराष्टÑीय फारच अनभिज्ञ, उदासीन आहोत.