शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठातर्फे लवकरच योगशिक्षण; रविवारी विसावा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:57 IST

आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आरोग्य विद्यापीठांतर्गत योगशिक्षणाचा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक : आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने आरोग्य विद्यापीठांतर्गत योगशिक्षणाचा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन रविवारी साजरा होणार असून, त्यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.शिक्षण, संशोधन कार्यक्रमांना जागतिकदृष्ट्या चालना देण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन केले आहे. परदेशात शिक्षण, संशोधनाची संधी मिळण्यासाठी २० देशांतील विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय करार लवकरच करण्यात येणार आहे. योगशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हैसेकर म्हणाले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरू होऊन राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या १०० जागा वाढल्याचेही ते म्हणाले.कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ई-पेमेंट गेटवे’ ही आॅनलाइन शुल्क प्रणाली तयार केली असून विद्यापीठाच्या वर्धापन दिनापासून त्याचा लाभ घेता येऊ शकेल. पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रबंध आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात व त्यांचे मूल्यांकनदेखील आॅनस्क्रीन पद्धतीने करण्यात येते. हे तंत्रज्ञान वापरणारे देशातील आपले एकमेव विद्यापीठ आहे.संशोधन नियतकालिक लवकरचसंशोधन साहित्य प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाचे पहिले संशोधन नियतकालिक एमयूएचएस हेल्थ सायन्स रिव्ह्यू लवकरच प्रकाशित होत आहे. त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.रुग्ण-डॉक्टर संवाद : हल्ली रुग्णालये व डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्ण-डॉक्टर यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी, गैरसमजाचे प्रसंग टाळण्यासाठी संवाद कौशल्य या विषयाचा वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.मेडिकल कॉलेज- ४०, दंतचिकित्सा- २९, आयुर्वेद- ६९, युनानी- ६, होमीओपॅथी- ४९, नर्सिंग- १०२, फिजिओथेरपी- ३८, अ‍ॅक्युपेशनल थेरपी- ६, बीएएसएलपी- ४, बीपीओ १, बी एस्सी आॅप्टोमेट्री-४ (एकूण- ३४८)

टॅग्स :Yogaयोग