शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काल शिंदेंनी आमदारांना भोजनाला बोलवलेले, पण रद्द केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 12:17 IST

मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते, महागाई, चीनचा धोका यावर शब्द काढला नाही. - संजय राऊत

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव का आणावा लागला? कारण या देशातील एक राज्य गेल्या साडे तीन महिन्यापासून हिंसेच्या वनव्यात पेटलेले आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. मोदी यासंदर्भात संसदेत येऊन निवेदन करण्यास तयार नव्हते. म्हणून अविश्वास ठराव आणावा लागल्याचे ठाकरे गट शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. मोदींनी विक्रमी भाषण केले आणि त्यात केवळ अडीच मिनिटेच मणिपूरवर बोलले, अशी टीका राऊत यांनी केली.  

मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते, महागाई, चीनचा धोका यावर शब्द काढला नाही. मणिपूरच्या समस्येला नेहरू जबाबदार आहेत असे ते म्हणतात. आता नेहरूंच्या प्रेमातून बाहेर पडा, दहा वर्ष आपले सरकार आहे, आपण काय केले? मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी होते आपण काय केले तेव्हा? पण जसे संताजी धनाजी दिसायचे तसे यांना नेहरू दिसतात. नेहरू हे फार मोठे नेते, त्यांना जगाची मान्यता आहे, तुम्ही सत्ता सोडा, तुम्ही कोणत्या राज्याचा प्रश्न सोडवला? आमच्या बेळगावचा प्रश्न तरी सोडवा, शांतीचा सूर्य कधी उगवेल? तुमचा सूर्य मावळणार आहे, 2024 ला ते बघा, असा इशारा राऊत यांनी दिला. 

फ्लाइंग किस काय असते? फ्लाइंग किस म्हणजे आपले प्रेम व्यक्त करण्याचे नवीन पिढीचे ते एक साधन आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या बायकांचे फ्लाइंग किस पाहिलेले आहेत. राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस दिले म्हणजे कोणाचा विनयभंग केले का? त्यांनी अत्यंत प्रेमाने आपल्या भावना व्यक्त केल्या, मोदींनी देखील फ्लाइंग किस द्यावा त्यांना कोणी अडवले आहे, असेही खोचकपणे राऊत म्हणाले. 

काल मुख्यमंत्री यांनी आपल्या आमदारांसाठी एक जेवण ठेवले होते. पण नंतर ते रद्द झाले. कारण, त्या जेवणामध्ये मारामाऱ्या होतील मंत्री पदावरून म्हणून काल त्यांचे हेलिकॉप्टर देखील उडू शकले नाही, असे राऊत म्हणाले.  त्यांच्या बाजूने जनता आणि निसर्ग देखील नाही, हे सर्व औट घटकेचे सरकार आहे. 2024 ला महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडियाचे सरकार येईल. तेव्हा तुम्ही कुठे जाल? माझ्या महाराष्ट्रातील पोलिसांना आणि तपास यंत्रणेला देखील सवाल आहे. 2024 ला या सर्व खोट्या तपासण्या चौकशा केसेस या बद्दल तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, कोणालाही दया, माया केली जाणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी