पुणे : भोपाळ कारागृहातून अतिरेक्यांनी केलेल्या पलायनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा मध्यवर्ती कारागृहाची मंगळवारी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे़ राज्यातील सर्व कारागृहांना त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातून ८ अतिरेकी सुरक्षा रक्षकाचा गळा कापून पळून गेले होते़ त्यानंतर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला़ या अतिरेक्यांपैकी तिघांचा पुण्यातील फरासखाना बॉम्बस्फोटामध्ये सहभाग होता़ या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातील सर्व बॅरेकची तपासणी करण्यात आली़ सुरक्षा गार्डना सूचना देण्यात आल्या़याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक व्ही़ टी़ पवार यांनी सांगितले, की कारागृहाच्या सुरक्षेबाबत नियमितपणे तपासणी केली जाते़ अशी एखादी घटना घडली, तर सावधानता म्हणून सुरक्षेची तपासणी केली जाते़ (प्रतिनिधी)
येरवडा कारागृहाची सुरक्षा तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:49 IST