शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 7:48 PM

कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय...

ठळक मुद्देराज्यातुन आलेल्या भाविक भक्तांनी देवदर्शन,दिवटी पाजळून तळीभंडार, आदी केले धार्मिक विधी गडकोट आवारात कांद्याची पात, वांग्याची भाजी, बाजरीची  भाकरी, आदी महाप्रसादाचे आयोजन सहा दिवसांच्या काळात भाविकभक्तांच्या वतीने मुख्य मंदीरात फुलांची आकर्षक सजावट

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय..खंडेरायाच्या जेजुरी गडावर राज्यभरातून आलेल्या एक लाखांवर भाविकांनी गर्दी केली होती.येळकोट येळकोट जयमल्हार च्या गजरात कुलदैवताचे दर्शन घेतले. वांग्याचे भरीत, कांद्याची पात, आणि रोडग्याच्या महाप्रसादाने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या खंडेरायाच्या षडरात्र उत्सवात घटस्थापना, होमहवन, यज्ञयाग, धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भाविकभक्तांसाठी विविध मिष्टान्न महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये किमान एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला शिवशंकरांनी मार्तंडभैरवाचा अवतार धारण करून ऋषी -मुनी आणि देव गणांचा छळ करणार्‍या मणी -मल्ल दैत्यांचा संहार केला हे युद्ध सहा दिवस चालले. म्हणून हा उत्सव सहा दिवस चालतो याला षडरात्र उत्सव देखील म्हणतात. तसेच आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी असे ही सबोधले जाते. या नवमीपसून खंडोबा भक्त चातुर्मास पाळतात, या काळात कांदा, वांगे खान्यातून वर्ज केले जाते, मात्र कुलदैवत खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सवाला कुलदैवताला भरीत रोडग्याचा नैवद्य अर्पण करून कांदा-वांगे खाण्यास सुरुवात होते. म्हणून या उत्सवाला "वांगेसट" असे ही म्हणतात. 

 परंपरेनुसार खंडोबा गडावर सहा दिवसांच्या उत्सवाचे नियोजन जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, बाळकृष्ण दीडभाई, अविनाश सातभाई ,प्रशांत सातभाई, हरिभाऊ लांघी, सतीश कदम, नितीन बारभाई, श्री मार्तंड देवसंस्थानचे सर्व विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी -मानकरी, सेवेकरी यांचेवतीने करण्यात आले होते. काल बुधवारी (दि.१२) सायंकाळचे सुमारास देवांचा तेलहंडा वाजत गाजत गडकोटावरून शहरातील चावडीत आणण्यात आला .यावेळी शिंदे,माळवदकर व खोमणे पाटील, झगडे फुलारी यांनी तेलहंड्याला  मान दिला .यानंतर मुख्य मंदिरात श्रींच्या मूर्तींना तेलवनाचा विधी पार पडला. आज गुरुवारी (दि.१३) पहाटेच्या ग्रामस्थ व मानकरी यांच्यावतीने करण्यात आलेल्या महापूजा -आरतीनंतर बालद्वारीतील देवांचे घट उठवण्यात आले. आणि उत्सवमूर्ती वाजत -गाजत मुख्य मंदिरात नेण्यात आल्या. सहा दिवसांच्या काळात भाविकभक्तांच्या वतीने मुख्य मंदीरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येत होती. तसेच गडकोटाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळची महापूजा देवसंस्थानच्या वतीने करण्यात आली यावेळी पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख उपस्थित होते. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गडकोट आवारात कांद्याची पात, वांग्याची भाजी, बाजरीची  भाकरी, आदी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ग्रामीण भागातुन आलेल्या भाविक भक्तांनी देवदर्शन,दिवटी पाजळून तळीभंडार, आदी धार्मिक विधी केले. कुलदैवताचे मूळ स्थान असणार्‍या कडेपठार मंदिरात ही भाविकांची मोठी गर्दी होती.गुरुवारी सकाळ पासूनच जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. मुख्य रस्त्यांवरून वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. जेजुरी पोलिस ठाण्याचे स. पो.नि. अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिसांनी वाहतुकीबरोबरच बंदोबस्त चोख ठेवला होता. 

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक