शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेसाठी यावर्षी राज्यातून 11 हजार जणांना संधी, यात्रेकरूंची संगणकाद्वारे सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 19:43 IST

इस्लाम धर्मामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या हज यात्रेसाठी यावर्षी राज्यातील ११ हजार ५२७ जणांना संधी मिळाली आहे.

मुंबई : इस्लाम धर्मामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणा-या हज यात्रेसाठी यावर्षी राज्यातील ११ हजार ५२७ जणांना संधी मिळाली आहे. गत वर्षापेक्षा ही संख्या २० टक्क्यांहून अधिक असून, हज यात्रेसाठीचे उपक्रम प्रभावीपणे राबविले जावेत यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी दिले.महाराष्ट्र राज्य हज समितीच्यावतीने हज यात्रा-२०१८ साठी संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरूंची निवड करण्यात आली. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी हज कमिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ए. खान, राज्य समितीचे इम्तियाज काझी उपस्थित होते. यावेळी सातत्याने तीन वर्षं अर्ज करूनही सोडतीमध्ये संधी न मिळालेल्यांना चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी पूर्ववत सुरू करावी, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.यावर्षी हज यात्रेसाठी राज्यभरातून ४३ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,९३९ जणांना ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि १६ महिलांसाठी राखीव कोट्यातून संधी मिळाली आहे. उर्वरित ९ हजार जणांची निवड ४१ हजार ८२४ अर्जांतून ‘ड्रॉ’ काढून करण्यात आली आहे. इम्तियाज काझी यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, उपसचिव तडवी, वक्फ बोर्डचे चेअरमन एम. एम. शेख, शाखा अधिकारी फारूक पठाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dilip Kambleदिलीप कांबळेMumbaiमुंबई