शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या प्रवेशद्वारावर यंदा सारस्वतांचा मेळा , साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान हिवरा आश्रमाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 13:13 IST

बहुप्रतिक्षित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात होणार आहे.  हिवरा आश्रमाला यावेळचा यजमानपदाचा मान  मिळाला आहे.

नागपूर, दि. 10 - बहुप्रतिक्षित 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात होणार आहे.  हिवरा आश्रमाला या वर्षीचा यजमानपदाचा मान  मिळाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. यजमानपदाबाबत एकमत नसल्याने आज मतदान झाले यामध्ये 5 विरुद्ध 1 मताने हिवरा आश्रमवर शिक्का मोर्तब करण्यात आले. 

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाची अधिकृत घोषणा रविवारी नागपुरात झाली. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाला जोडणारा सेतू म्हणून ज्याची ओळख आहे त्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमला या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. महामंडळाच्या नागपुरातील कार्यालयात रविवारी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात संमेलनस्थळ पाहणी समितीने आपला अहवाल सादर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले. या मतदानात एक विरुद्ध पाच अशा फरकाने हिवरा आश्रमला पसंती मिळाली. रविवारच्या अंकात ‘लोकमत’ने हिवरा आश्रमला यजमानपद मिळणार, असे भाकित वर्तविले होते. ते खरे ठरले. - म्हणून हिवरा आश्रमचा दावा ठरला प्रबळराजमाता जिजाऊ, संत चोखामेळा, कविवर्य ना. घ. देशपांडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व हिवरा आश्रमची खरी ओळख असलेले संत शुकदास महाराज अशी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. परंतु अद्याप संमेलनाच्या यजमानपदाचा मान या जिल्ह्याला मिळालेला नाही, शिवाय संमेलनाची आयोजक संस्था स्वत: विवेकानंद आश्रम आहे. भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव या संस्थेच्या पाठीशी आहे. दोन हजार साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था व दोन हजार स्वयंसेवकांची शिस्तबद्ध फळीदेखील या आश्रमात आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन हे संमेलन हिवरा आश्रमला दिले जाईल, अशी शक्यता होती.