शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचे संमेलन ठरणार साहित्यिक क्रांतीची नांदी; जानेवारीत होणार सारस्वतांचे मंथन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 19:44 IST

निवडणुकांचे वर्ष म्हणून अख्ख्या देशाचे लक्ष २०१९ कडे लागलेले असताना साहित्यिकांनी मात्र याच वर्षात होणा-या संमेलनात चक्क निवडणुकीलाच फाटा दिला.

यवतमाळ : निवडणुकांचे वर्ष म्हणून अख्ख्या देशाचे लक्ष २०१९ कडे लागलेले असताना साहित्यिकांनी मात्र याच वर्षात होणा-या संमेलनात चक्क निवडणुकीलाच फाटा दिला. दरवर्षी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारी निवडणूक, त्यातील पातळी सोडणारे वाद टाळून यंदा संमेलनाध्यक्ष एकमताने निवडण्यात आला. मराठी साहित्य विश्वासाठी क्रांतिकारक ठरलेल्या या नव्या पायंड्याची सुरवात रविवारी यवतमाळात झाली, हे विशेष.तब्बल ४६ वर्षांनंतर यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. याच संमेलनाच्या निमित्ताने साहित्य महामंडळाने तीन क्रांतीकारक बदल आपल्या घटनेत करवून घेतले. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, संमेलनाध्यक्षांची निवडणूक बाद केली. त्याऐवजी घटक संस्थांनी सूचविलेल्या नावांतून एका साहित्यिकाला अध्यक्षपदाचा बहुमान सन्मानानेच बहाल करायचा. तसा तो रविवारी डॉ. अरुणा ढेरे यांना बहाल करण्यात आला. त्यासाठी महामंडळाचे महाराष्ट्रभरातील पदाधिकारी यवतमाळच्या डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्रात जमले होते. याच संमेलनाच्या निमित्ताने महामंडळाने आपला परिघ अधिक विस्तारला आहे. आतापर्यंत साहित्य महामंडळासोबत केवळ घटक संस्था, समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्थाच काम करू शकत होत्या. मात्र आता महामंडळाने आपल्या घटनेत बदल करून ‘सहयोगी संस्था’ हा नवा प्रकार सामील केला आहे. समाजात विविध समूहांचे विविध विचार प्रवाह आहेत. त्यांच्या-त्यांच्या सातित्यिक संस्थाही आहेत. या संस्थांना अखिल भारतीय साहित्य महामंडळासोबत काम करता येणार आहे. मात्र त्यासाठी घटक संस्थेची नाहरकत असावी आणि २५ वर्षांपासून ती संस्था नोंदणीकृत असावी. महामंडळाने केलेला तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे, संमेलनाशिवाय वार्षिक अधिवेशनही घेतले जाणार आहे. अगदी प्रारंभीच्या साहित्य संमेलनांना अधिवेशनाचेच स्वरूप होते. मात्र, काळ बदलत गेला, तशी संमेलनेही दिमाखदार सोहळ्यात रूपांतरित झाली. परंतु यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा अधिवेशने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही साहित्यविश्वासाठी मोठी देणच. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर (समता मैदान) ११, १२, १३ जानेवारीला होणा-या साहित्य संमेलनाचा मुख्य केंद्र शेतकरी राहणार आहे. पहिलाच परिसंवाद शेतीविषयी होतोय. ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ असा विषय घेऊन शहरी साहित्यिकांनाच जाब विचारला जाणार आहे. त्याचवेळी ‘तत्वशील समाजघडणीसाठी आज महानुभाव, वारकरी, बसवेश्वर विचारांची गरज’ या परिसंवादात सर्वसमावेशक क्रांतीकारी विचारांचीच मांडणी होण्याची शक्यता आहे. तर तिस-या परिसंवादात ‘माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची?’ हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तांड्यांच्या, पोडांच्या व्यथा मांडणारअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फारसे कधी चर्चेत न आलेले तांडे, पोड यवतमाळच्या संमेलनात लक्षवेधी ठरणार आहेत. बंजारा तांडे, कोलाम पोड यांचे जगणे, त्यातील अडचणी, तेथील वैशिष्ट्ये यावर विशेष चर्चा झडणार आहे. ‘कथा आणि व्यथा तांड्यांच्या पोडांच्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जनजीवन पहिल्यांदाच सारस्वतांच्या नोंदवहीत नोंदविले जाणार आहे. तर परिसरातील वºहाडी बोलीचा सन्मान करण्यासाठी खास व-हाडी कविसंमेलनही होणार आहे.

पूर्वी संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत ११०० लोक मत देत होते. त्यातून जिंकणा-या किंवा हरणा-या उमेदवाराचे श्रेय किंवा दोष साहित्य संस्थांवर येत नव्हते. तर तो-तो उमेदवारच विजय किंवा पराजयासाठी जबाबदार ठरत होता. आताही निवडणूकच झाली. पण मत देणारे लोक मर्यादित होते. या निवडीत ज्या मोठ मोठ्या साहित्यिकांना शून्य मत मिळाले, त्याची जबाबदारी त्यांचे नाव सूचविणाºया संस्थांवर येते.- कौतिकराव ठाले पाटील, साहित्य महामंडळाचे सदस्य

यवतमाळात संमेलन होत असल्याने अतिशय आनंद झाला. हे संमेलन अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडेल याविषयी विश्वास आहे. अरुणातार्इंच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. त्यासंदर्भात महामंडळाच्या प्रमुखांनी दिलेली माहितीच अंतिम मानावी.- आसाराम लोमटे, साहित्य महामंडळाचे सदस्य

यवतमाळला साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान दिल्याबद्दल साहित्य महामंडळाच्या सर्व पदाधिकाºयांचे आभार मानतो. यवतमाळचे हे संमेलन निश्चितच मराठीचे महत्त्व सातासमुद्रा पार पोहोचवेल. संमेलन भव्य दिव्यच होईल. पण भव्यता केवळ मोठ्या इमारतीत, मंडपात नसते. तर साहित्यिकांच्या शब्दातील भव्यता लक्षात घ्यावी. तशीच भव्यता या संमेलनात दिसेल.- मदन येरावार, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र