शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीला मोठा दिलासा, भावना गवळींची नाराजी दूर; CM एकनाथ शिंदेंची शिष्टाई यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 17:26 IST

loksabha Election 2024: यवतमाळ वाशिम मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी न देता तिथे महायुतीकडून राजश्री पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलं. त्यामुळे नाराज झालेल्या भावना गवळी या प्रचारापासून दूर होत्या. मात्र आता त्यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे.

यवतमाळ - Bhawana Gawli on Yavatmal Wasim ( Marathi News ) मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. परंतु उमेदवारी न मिळाल्यानं मला खंत वाटली. खंत वाटल्याने मी बाहेर पडली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी ज्याप्रकारे राज्यात काम केले आहे. पोटतिडकीने ते रात्रंदिवस काम करतायेत. त्यात अबकी बार ४०० पार या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला साद देत मी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचं काम करणार आहे असं विधान यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी केले आहे. त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल्याचं दिसून येते. 

भावना गवळी म्हणाल्या की, मित्रपक्ष आणि घटक पक्षासोबत आमची आजपासून बैठक, मेळावे सुरू होतील. राजश्री पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी २५ वर्षापासून काम करते, शिवसेना जिल्हाप्रमुख, खासदार म्हणून काम केलेय. माझे वडील शिवसेनेत होते. लहानपणापासून बाळकडू मिळाले आहे. मला काय भेटतंय यासाठी मी काम करत नाही. माझे लक्ष पदावर नव्हते. जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याला तडा जाणार नाही यासाठी  मी काम करत आहे. माझ्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाचा आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा चांगली झाली. पुढच्या काळात कसा प्रचार करायचा, कशा जबाबदाऱ्या घ्यायच्या त्यावर चर्चा झालीय. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ज्यारितीने माझा प्रचार मी करत होते, तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे काही झाले ते भूतकाळ आहे. माझ्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाचा असून मी कधी प्रसिद्धीच्या भानगडीत पडले नाही. सातत्याने माझ्या मताधिक्यात वाढ होत आलीय. पक्षासाठी मी बांधील आहे असं भावना गवळी यांनी सांगितले.

दरम्यान, मी संघर्षातून पुढे आलीय, त्यामुळे नाराज होत नाही. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करणारी मी आहे. त्याचसोबत मी लढणार आहे आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी लढणार आहे. २५ वर्ष मी कुटुंब म्हणून मतदारसंघात काम केले आहे. जुने ऋणानुबंध जुळले जातात. त्यामुळे मतदारांमध्ये काहीसी नाराजी वाटणे साहजिकच आहे. परंतु महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणे यासाठी आम्ही कामाला लागलोय. माझ्या आयुष्यात नेहमी चढउतार पाहिले आहे असं भावना गवळी यांनी म्हटलं. 

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४