शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये कामगार नेते अशोक देठे यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 10:31 IST

वणी तालुक्यातील कुंभारखनी वेकोली वसाहतीत जुन्या वैमनस्यातून कामगार नेता अशोक चारूदत्त देठे (45) याची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृताची पत्नी गंभीर जखमी झाली.

यवतमाळ : वेकोलीच्या कामगार संघटनेच्या निवडणुकीवरून झालेल्या वादात एका कामगार नेत्याची गुप्तीने वार करून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील कुंभारखणी कोळसा खाणीच्या कामगार वसाहतीत घडली.  याप्रकरणी वणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.अशोक चारूदत्त देठे (४५) असे मृत कामगार नेत्याचे नाव आहे. याप्रकरणात उमेश किशोरचंद्र रॉय (२७), लक्ष्मीकांत रॉय (२५) व सूरज सागर (२५) या तिघांना शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आठ दिवसांपूर्वी कुंभारखणी येथील वेकोलि कामगार संघटनेची निवडणूक पार पडली. अटीतटीच्या या निवडणुकीत अशोक देठे अध्यक्षपदी निवडून आले. तेथूनच वादाची ठिणगी पडली. निवडणुकीत निवडून आल्यानंतर अशोक देठे हे विरोधकांना जाणुनबुजून टोमणे हानत होते, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. शनिवारी कुंभारखणी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातदेखिल अशोक देठे यांनी विरोधकांना निवडणुकीवरून टोमणे हानले. त्यामुळे विरोधी गटाचे माथे सणकले. तेथेही शाब्दीक वादावादी झाली. याच मुद्यावरून शनिवारी रात्री पुन्हा अशोक देठे व रॉय गटात वाद झाला. यावेळी अशोक देठे आरोपींच्या घरासमोर उभे असताना विरोधी गटातील उमेश रॉय, लक्ष्मीकांत रॉय व सूरज सागर या तिघांनी अशोक देठे यांच्यावर गुप्तीने हल्ला चढविला. या तिघांपैकी एकाने लोखंडी रॉडने देठे यांच्या डोक्यावर वार केला, तर अन्य एकाने देठे यांच्या शरिरावर गुप्तीने सपासप वार केले. त्यामुळे अशोक देठे रक्ताच्या थारोळ्यात कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.दरम्यान घटनेची माहिती मिळताच वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडेमोडे, डी.बी.पथकातील सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी देठेचा मृतदेह ताब्यात घेऊन वणीच्या ग्रामीण रूग्णालयात आणला. त्यानंतर पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. रविवारी दुपारपर्यंत पोलिसांकडून आरोपींची विचारपूस केली जात होती. 

मृताच्या पत्नीला धक्काअशोक देठे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर त्यांची पत्नी भावना देठे यांना चांगलाच मानसिक धक्का बसला. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांनाही वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :YavatmalयवतमाळDeathमृत्यू