शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

यशवंतराव चव्हाण दोनदा मेरिटमध्ये; नाथ पै पहिले तर अजित पवार शेवटचे मेरिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 02:30 IST

नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले.

- प्रेमदास राठोडआजवरच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात बाजी मारून एकूण ७४६ जण लोकसभेत पोहोचले. यापैकी फक्त १४ उमेदवार ७५ टक्क्क््यांहून जास्त मते घेऊन मेरिटमध्ये पास झाले. १४ मधील १० जणांना १९७१ च्या निवडणुकीत हे यश मिळाले. यशवंतराव चव्हाण हे दोनदा (सातारा १९७१ व १९७७) असे यश मिळवणारे एकमेव नेते ठरले. पीएसपीचे नाथ पै (राजापूर १९५७) वगळता मेरिटमध्ये आलेले बाकी सर्व १३ काँग्रेसचे होते. नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले. १९९१ नंतर महाराष्ट्रात कोणालाही एवढे मोठे यश मिळालेले नाही.साताऱ्याने तब्बल तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेरिटसह उमेदवाराला पास केले. शेजारच्या कराडने दोनदा उमेदवाराला मेरिटसह लोकसभेत पाठविले. अमरावती, बारामती, भंडारा, खामगाव, खेड, मालेगाव, राजापूर, रामटेक, सांगली आणि वर्धा या १० दहा मतदारसंघांनी एकेकदा मेरिटसह उमेदवारांना लोकसभेत पाठविण्याचा विक्रम केला आहे.१९७१ मध्ये कराडमधून विजयी झालेले दाजीसाहेब चव्हाण यांना ८६.१६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी इतर सर्व ६ जणांची अनामत जप्त झाली होती. दाजीसाहेबांचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई यांना येथेच १९८४ मध्ये ८३.०९ टक्के मते मिळाली होती. दाजीसाहेब व प्रमिलाबाई यांचे सुपूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी १९९१ ते ९८ तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकून येथे हॅट्ट्रिक केली. पण त्यांना ६२ टक्क्क््यांपेक्षा जास्त मते मिळू शकली नाहीत.७५ टक्क्क््यांहून जास्त मतांसह लोकसभेत गेलेले इतर नेतेअमृत गणपत सोनार (१९७१ रामटेक, प्राप्त मते ८३.०२ टक्के), प्रतापराव भोसले (१९८९ सातारा, ८१.९४ टक्के), अर्जुनराव कस्तुरे (१९७१ खामगाव, ८०.६५ टक्के), नाथ पै (१९५७ राजापूर, ८०.६५ टक्के), गणपती गोटखिंडे (१९७१ सांगली, ७८.१७ टक्के), कृष्णराव देशमुख (१९७१ अमरावती, ७७.६१ टक्के), विश्वंभरदास दुबे (१९७१ भंडारा, ७६.५८ टक्के), जे.जी. कदम (१९७१ वर्धा, ७५.७३ टक्के), अनंतराव पाटील (१९७१ खेड, ७५.५४ टक्के), झामरू कहांडोळे (१९७१ मालेगाव, ७५.१९ टक्के) आणि अजित पवार (१९९१ बारामती, ७५.०४ टक्के) गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे गोपाळ शेट्टी राज्यातून सर्वाधिक ७०.१५ टक्के मतांसह बाजी मारली. त्यापूर्वी २००९ मध्ये सर्वाधिक ६६.४६ टक्के मते सुप्रिया सुळे यांना मिळाली. शरद पवार यांना २०१४ (७१.०३ टक्के) व १९९८ (६५.८१ टक्के) या दोन निवडणुकांत राज्यातून सर्वाधिक मते मिळाली होती. या तिघांनाही ७५ टक्क्क््यांचा टप्पा मात्र गाठता आला नाही. गोपाळ शेट्टी व सुप्रिया सुळे यंदाही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक