मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०४ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१६’ हा पुरस्कार आधार कार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार सोहळा
By admin | Updated: March 4, 2017 05:59 IST