मुंबई : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी यदु श्रीराम जोशी यांची सोमवारी बहुमताने निवड झाली. अधिस्वीकृती समितीच्या सर्व २७ सदस्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान केले. त्यामध्ये जोशी यांना १८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांना ९ मते मिळाली. निवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी आर.एन. गरुड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक (माहिती) शिवाजी मानकर, उपसंचालक (वृत्त) ज्ञानोबा इगवे, वरिष्ठ सहायक संचालक डॉ. संभाजी खराट या वेळी उपस्थित होते.
राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी यदू जोशी
By admin | Updated: September 15, 2015 02:36 IST