शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बंडखोर १५ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा, कुटुंबीयांना संरक्षण द्या - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 06:13 IST

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची घरे, कार्यालयांवर हल्ले होत असतानाच त्यातील १५ आमदारांच्या कुटुंबीयांना केंद्राच्या अखत्यारितील वाय प्लस सुरक्षेसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संरक्षण दिले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.सीआरपीएफची सुरक्षा पुरविलेल्या १५ जणांमध्ये मंत्री संदीपान भुमरे, दादा भुसे, माजी मंत्री आ.संजय राठोड, आ. रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जयस्वाल, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.

कोरोना निगेटिव्ह येताच राज्यपाल ॲक्टिव्ह-  येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. -  राज्यपाल गेले चारपाच दिवस कोरोनाग्रस्त होते व खासगी इस्पितळात उपचार घेत होते. आज ते परत येताच ॲक्टिव्ह झाले. -  आमदारांच्या सुरक्षेचा विषय त्यांनी हाती घेतला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्षाचे अनेक प्रसंग घडले आहेत.

आमदार मुंबईत आल्यावरही मिळणार केंद्राची सुरक्षागुवाहाटीतील बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठीदेखील केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तैनात करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विमानतळावर ते उतरल्यापासून ज्या हॉटेलवर त्यांचा मुक्काम असेल तिथे, ते विधानभवनात जातानादेखील सीआरपीएफ जवानांचा गराडा असेल. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस