शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक : ‘सोशल मीडिया’मुळे तरुणाई बेफाम, लैंगिकतेविषयी विकृत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:22 IST

लहान मुलांप्रमाणेच किशोरवयीन नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेली मुले ‘स्क्रिन अ‍ॅडिक्शन’च्या आवेगात वाहवत जाऊ लागली आहेत.

ठळक मुद्देलहान मुलांप्रमाणेच किशोरवयीन नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेली मुले ‘स्क्रिन अ‍ॅडिक्शन’च्या आवेगात वाहवत जाऊ लागली आहेत. सोशल मीडियावरील अतिसक्रिय असणे, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या मेसेजिंग अ‍ॅपवर खर्च केला जाणारा अमर्यादित वेळ आणि गेम्सच लागलेलं वेड या मुलांची ऊर्जा खर्चच होऊ देत नाही पॉर्न अ‍ॅडिक्ट होण्याचेही प्रमाण वाढीस लागल्याने लैंगिकतेविषयी योग्य माहिती मिळण्याऐवजी विकृत माहिती या मुलांची दिशा भरकटवित आहे

- लक्ष्मण मोरेपुणे  - लहान मुलांप्रमाणेच किशोरवयीन नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेली मुले ‘स्क्रिन अ‍ॅडिक्शन’च्या आवेगात वाहवत जाऊ लागली आहेत. सोशल मीडियावरील अतिसक्रिय असणे, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या मेसेजिंग अ‍ॅपवर खर्च केला जाणारा अमर्यादित वेळ आणि गेम्सच लागलेलं वेड या मुलांची ऊर्जा खर्चच होऊ देत नाही. त्यातच पॉर्न अ‍ॅडिक्ट होण्याचेही प्रमाण वाढीस लागल्याने लैंगिकतेविषयी योग्य माहिती मिळण्याऐवजी विकृत माहिती या मुलांची दिशा भरकटवित आहे.मुलांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ लागला असून, सतत भांडणे, विचित्र वागणे आणि पालकांना प्रसंगी मारहाण अशा घटना घडू लागल्या आहेत. मुलांच्या वागण्याबोलण्यात दिवसेंदिवस घडू लागलेले आमूलाग्र बदल, त्यातून वाढत चाललेली अस्वस्थता, पॉर्न आणि स्क्रिन अ‍ॅडिक्ट होणे, नको त्या गोष्टींची लत लागणे, सिगरेट, तंबाखू, मद्यासह हुक्का आणि मेफेड्रोनसारख्या अमली पदार्थांची ओढ लागणे ही पालकांसमोरची फार मोठी समस्या बनली आहे. दर दहा कुटुंबांमध्ये दोन कुटुंंबांत ही समस्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांना मुलांच्या या ‘अ‍ॅडिक्शन’ला कसा लगाम घालावा, हेच समजेनासे झाले आहे. शहरातील व्यसनमुक्ती केंद्रांकडे पालकांच्या शेकडो तक्रारी फोन कॉल्सद्वारे आणि प्रत्यक्ष भेटीमधून येऊ लागल्या आहेत. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना ‘इंटरनेट आणि स्क्रिन अ‍ॅडीक्शन’वर वेगळे समुपदेशन कक्ष उघडावे लागले आहेत.स्मार्ट टीव्हीचा रिमोटही मोबाईलवरचबाजारामध्ये आलेले स्मार्ट टीव्ही वापरण्याकडे कल वाढलेला आहे. या टीव्ही संचामध्ये यू ट्यूब, नेटफ्लिक्स, अमेझॉन आदींसारखे अ‍ॅप देण्यात आले आहेत. केवळ वायफायवर हे सर्व अ‍ॅप सुरू होतात.स्मार्ट मोबाईल फोनमध्येगुगलच्या प्ले स्टोअरमधूनकोणत्याही टीव्ही किंवा डीटीएच कंपनीचा रिमोट डाऊनलोड करून घेता येतो.त्यामुळे मोबाईल आणि टीव्ही यांचा एकाच वेळी वापर करणाºयांची संख्याही वाढत चालली आहे.किशोरवयीन आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यू ट्यूबचा सर्वाधिक वापर केला जातो. अन्य सर्व अ‍ॅप्समध्ये ‘लॉग आऊट’चा आॅप्शन असतो. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप आणि यू ट्यूबमध्ये हा आॅप्शन नाही.व्हॉट्सअ‍ॅपवर विविध ग्रुप्सवर अश्लील क्लिप्सच्या आणि विनोदांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे लैंगिक विकृतीची शक्यता आहे. यू ट्यूबवर लैंगिकतेविषयी माहिती मिळवण्याचाही या वयातील मुले प्रयत्न करीत असतात. मात्र, त्यांना योग्य ज्ञान मिळेलच याची खात्री नसते.विकृत आणि चुकीची माहिती त्यांच्यासमोर येण्याची शक्यता असते. अनेकदा घरातीलएखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेली अश्लील व्हिडीओ क्लिपही पाहिली जाते.लाइव्ह असणे धोक्याचेफेसबुक लाइव्हचे वेडही मुलांमध्ये पाहायला मिळत आहे. रात्रीची जागरणे, चॅटिंग आणि गेम्ससोबतच फेसबुक, इन्स्टाग्रामवर लाइव्ह राहण्याची सवय जडू लागली आहे. एफबी लाइव्ह करून ड्रायव्हिंगचा स्पीड दाखविताना अपघातामध्ये अनेक तरुणांचे बळी गेले आहेत.अनलिमिटेड डाटा हवाय कशाला?जवळपास सर्वच मोबाईल कंपन्या आता अमर्यादित इंटरनेट डाटा अशा योजना ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे मुले सतत इंटरनेटवर असतात. त्यामुळे एकमेकांशी असलेला संवाद हरवत चालला आहे. मुले इंटरनेटद्वारेच एकमेकांशी लिंक करून व्हिडीओ गेम्स खेळतात. सतत पुढच्यास्टेजबाबत त्यांच्यामध्ये उत्कंठा असते. त्यामुळेवाचन होत नाही....आजारपणाची लक्षणेचष्मा लागणे, डोळ्यांचे आजारभुकेवर नियंत्रण न राहणेअभ्यासात लक्ष न लागणेगेम्सचे व्यसन लागणेआक्रमक होणेपुरेशी झोप न होणेमणक्याचे आणि मानेचे आजार1 फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवर लाईक, कमेंट आल्या नाहीत तर मुलांची प्रचंड चिडचिड सुरू होते. एकमेकांना फोन करून तू लाइक, कमेंट का केली नाही यावरून मुले वाद घालतात. यासोबतच एफबी लाइव्हचे प्रमाण वाढले आहे. त्यामधून घडलेल्या अपघातात काही तरुणांना प्राणही गमवावे लागले आहेत.2फेसबुक , व्हॉट्सअ‍ॅप तसेच इन्स्टाग्रामवर ठेवले जाणारे स्टेट्स सतत पाहिले जातात. या स्टेटस ठेवण्यावरूनही अनेकदा भांडणे होतात. कोणाला तरी आनंद देण्यासाठी, खिजवण्यासाठी तसेच दहशत माजविण्यासाठीही या स्टेटसचा वापर केला जातो.काही महिन्यांपूर्वी चाकणमध्ये अशाच प्रकारे व्हॉट्स अ‍ॅपवरील स्टेटसमुळे तरुणाचा खून करण्यात आला होता.व्हिडीओ कॉल्स आणि न्यूड चॅटिंग धोकादायकफेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंगचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच तरुण तरुणींमध्ये ‘न्यूड चॅटिंग’चे प्रमाण वाढले आहे. एकमेकांना न्यूड फोटो आणि स्वत:चेच अश्लील व्हिडीओ पाठविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामधून ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडतात. मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPuneपुणे