शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१२० महिला चित्रकारांनी साकारले जगातले सर्वात मोठे वारली चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 07:09 IST

जी-२० मध्ये पालघरच्या ‘द धवलेरी ग्रुप’च्या सहा चित्रकारांचीही कलाकारी

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : जी-२० परिषदेनिमित्त औरंगाबाद महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या सहकार्याने ४५६ फूट लांब आणि ७ फूट उंच अशा ३२०० चौरस मीटरच्या भिंतीवर ‘वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंग’ चितारण्यात आली आहे. त्याकरिता पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली महिला ‘द धवलेरी ग्रुप’च्या सहा चित्रकार औरंगाबाद येथे गेल्या होत्या. शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी या शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते महावीर चौक रस्त्यावरील एसटी कार्यशाळेच्या भिंतीवर १२० महिला चित्रकारांनी जगातील सर्वांत मोठे वारली चित्र सहा तासांत काढून विश्वविक्रमाला गवसणी घातली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पालघर येथील आदिवासी वारली महिला ‘द धवलेरी ग्रुप’च्या कीर्ती नीलेश वरठा यांना १५ फेब्रुवारी रोजी एका एनजीओच्या माध्यमातून दूरध्वनीवरून या संकल्पनेची माहिती देण्यात आली, मात्र वारली पेंटिंग ही आमची ऑथेन्टिक असून त्याचे जीआय रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगून तुम्ही ती पेंटिंग या पद्धतीने काढू शकत नसल्याचे कीर्ती यांनी समजावले. वारली पेंटिंगचा व्यापार किंवा क्रेडिट तुम्ही घेऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या ग्रुपच्या मार्गदर्शन व सहकार्याने ही कलाकृती पूर्ण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कीर्ती यांनी तो मान्य करून वारली पेंटिंग असलेली छायाचित्रे आयोजकांना पाठवली, मात्र ही पेंटिंग या ग्रुपच्या सूचनेनुसार काढावी, अशी अट घातली. 

ती मान्य झाल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील कीर्ती वरठा (पालघर माहीम), पूनम कोल (डहाणू वाकी), राजेश्री गोलीम (पालघर  नीहे), तारा बोंबाडे (पालघर आदिवासी नाका), तनया उराडे (केळवा रोठे), शालिनी कासट (पालघर) या सहा महिला वारली चित्रकार औरंगाबादला दाखल झाल्या. १७ फेब्रुवारीला स्थानिक १२० मुलींसह सकाळी १० वाजता या ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली चित्र काढण्यास प्रारंभ झाला. या पेंटिंगमध्ये वारली महिलेचे लग्नापासून ते मृत्यूपर्यंतचे पारंपरिक पद्धतीने दैनंदिन जीवन दाखविण्यात आले आहे. 

आदिवासींचे संपूर्ण जीवनआदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते, समाजाचे पारंपरिक नृत्य, राहणीमान, सण-उत्सव, जल-जंगल-जमिनीशी जुळलेली नाळ इ. लहानसहान बाबींना चित्रात स्थान देण्यात आले आहे. ही पेंटिंग नसून वारली लिपी असल्याचे या महिला वारली चित्रकारांनी उपस्थितांना सांगितले. आदिवासींची जीवनपद्धती सर्वांनी अंगिकारल्यास पर्यावरणाचा जटील प्रश्न मार्गी लागू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या समाजाच्या पारंपरिक कलेचा विश्वविक्रम नोंदला गेला, त्याला आपला हातभार लागल्याने या सहाही महिला चित्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.