शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक व्याघ्र दिवस विशेष: ‘सह्याद्री-कोकण’च्या पट्ट्यात ३२ वाघांचा वावर, व्याघ्र भ्रमणमार्गावर अंडरपास-ओव्हरपासचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:08 IST

वाघांच्या संरक्षणाबाबत कृती आराखडा गरजेचा

कोल्हापूर : राज्यात असंरक्षित वनांमध्ये किंवा व्याघ्र प्रकल्पाबाहेर अधिवास करणाऱ्या वाघांच्या नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारचा कृती आराखडा वनविभागाने तयार केलेला नाही. ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या व्याघ्र भ्रमणमार्गावर अंडरपास-ओव्हरपासचा अभाव आहे.

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वाइल्डलाइफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट’ने (डब्लूसीटी) कोल्हापूरवनविभाग आणि ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या मदतीने तयार केलेल्या अहवालात प्रसिद्ध केली आहे.

राज्य सरकार राज्यातील वाढलेल्या वाघांच्या संख्येबाबत स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तरी व्याघ्र नियोजनामधील काही बाबींकडे यंत्रणेने सपशेल दुर्लक्ष केले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात जन्मलेला निमवयस्क नर वाघ हा बऱ्याचदा हद्दीचा शोधात लांबवर प्रवास करतो. या प्रवासात बऱ्याचदा तो असंरक्षित वनांमधून प्रवास करत निश्चित ठिकाणी जात असतो. अशाप्रकारे वाघ जेव्हा भ्रमण मार्गावर असतो, त्यावेळी त्याचे नियोजन कसे करावे, यासंदर्भातदेखील प्रमाणभूत कार्यपद्धती (एसओपी) उपलब्ध नाही.‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’च्या व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी या नव्या रस्त्यावर कोल्हापूरमधील आंबा येथे कोणत्याही प्रकारचे अंडरपास किंवा ओव्हरपास बांधण्यात आलेले नाहीत. हाच रस्ता ओलांडून राधानगरीमधील ‘टी-१’ आणि ‘टी-२’ हे दोन नर वाघ चांदोली अभयारण्यात गेले आहेत. शिकाऱ्यांच्या बाबतही वनविभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे.

मृत्यूमागील कारणे काय?

  • राज्यातील वाघांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी वनक्षेत्रामध्ये घट होत आहे.
  • असंरक्षित क्षेत्रामध्ये वाढणाऱ्या वाघांच्या संख्येबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही.
  • व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गावर अंडरपास-ओव्हरपासचा अभाव.
  • शिकाऱ्यांचा मागमूस काढण्यासाठी आवश्यक असलेली अपुरी यंत्रणा. व्याघ्र भ्रमणमार्गामधील क्षेत्रांच्या संरक्षणामध्ये असलेले अपुरे नियोजन.

व्याघ्र भ्रमणमार्गामधून जाणाऱ्या प्रस्तावित रस्ते प्रकल्पात वन्यजीवांच्या सुकर भ्रमणांसाठी उपाययोजना राबवण्यामध्येही सरकार थंडावलेले दिसते. - गिरीश पंजाबी, वन्यजीव संशोधक, डब्ल्यूसीटी