शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक चिमणी दिन : काँक्रीटच्या जंगलामुळे मुंबईतून चिमणी उडाली भुर्रऽऽऽ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:05 IST

बदलत्या परिस्थितीशी चिमण्यांना जुळवून घ्यावे लागत असले तरी त्याचा फटका त्यांच्या जीवनशैलीला बसत आहे. 

सचिन लुंगसे - मुंबई : मुंबई शहरात सिमेंट-काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचत आहे.  या पर्यावरणाचा एक भाग असलेली चिऊताई मुंबईचे उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरांत स्थलांतरित हाेत आहे, असे निरीक्षण निसर्ग अभ्यासकांनी नोंदविले आहे.  भायखळा येथील राणीची बाग, धारावी येथील निसर्गउद्यान, बीकेसी येथील मिठी नदीचा परिसर, आरे कॉलनी, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर तसेच भांडुपसह लगतच्या परिसरातील हिरवळ आणि तिवरांच्या परिसरांत चिमण्या आढळून येत असल्या तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पर्यावरणाची हानी होत असून, त्याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई झपाट्याने बदलली आहे. बदलत्या परिस्थितीशी चिमण्यांना जुळवून घ्यावे लागत असले तरी त्याचा फटका त्यांच्या जीवनशैलीला बसत आहे. मुंबईतील चिमण्यांचे स्थलांतर थांबवायचे असेल  तर त्यांना आवश्यक अधिवास तयार करण्याची गरज आहे. अधिकाधिक हिरवळ तयार करण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. शिवाय आपण राहतो त्या ठिकाणी चिमण्यांसाठी अन्न देणे, त्यांना पाणी देणे, त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी बनविणे, आदी उपाय करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून असे उपाय केले जात आहेत. मात्र हे प्रमाण तुलनेने कमी आहे. ज्या पद्धतीने पर्यावरणाचा विनाश होत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने पर्यावरण संवर्धनासाठी काम झाले पाहिजे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

‘चिमण्यांनी मुंबई साेडली, असे म्हणता येणार नाही’मुंबई शहरात सुरू असलेले खोदकाम, इतर अनेक बांधकामे, प्रकल्प कामे आणि सातत्याने होणारा आवाज अशा अनेक कारणांमुळे चिमण्या शहरातून उपनगरांत स्थलांतरित होत आहेत किंवा येथील त्यांचे प्रमाण कमी होत आहे. जेथे हिरवळ किंवा झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत, तिकडे चिमण्या वास्तव्यास प्राधान्य देत आहेत. पण याचा अर्थ चिमण्यांनी मुंबई सोडली, असा होत नाही. त्या स्थलांतरित होत आहेत, असे आपण म्हणू शकतो.  - विजय अवसरे, निसर्ग अभ्यासक

या चिमण्यांनो, परत फिरा...चिमण्यांनी मुंबईत पुन्हा यावे यासाठी त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देणे, घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी, घराभोवती छोटी झाडेझुडपे लावणे, दाणा-पाणी ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई