शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

World Consumer Day: राज्यात ग्राहकांच्या 25 हजार प्रकरणांचा निकाल प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:45 IST

१५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायदा अंमलबजावणीतून ग्राहक हित आणि संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच स्थापन झाले.

सुदाम देशमुख -  अहमदनगर : ग्राहकांना संरक्षण मिळावे, म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच स्थापन झाले. मात्र, या मंचात ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे प्रमाण केवळ दोन टक्क्यांच्या खाली असल्याचे दिसून आले आहे. राज्यात तब्बल २५ हजार प्रकरणांचा अद्याप निपटाराच झाला नसल्याने ग्राहक न्यायापासून वंचित आहेत. १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायदा अंमलबजावणीतून ग्राहक हित आणि संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच स्थापन झाले. ग्राहकाच्या जीविताला व मालमत्तेला धोकादायक ठरेल, असा माल किंवा वस्तू बाजारात विकण्यापासून संरक्षणाचा हक्क, मालाचा दर्जा, परिमाण, शुद्धता, क्षमता, मानक आणि किंमत याबद्दल माहिती मिळण्याचा हक्क या कायद्यान्वये ग्राहकाला मिळाला आहे. मालाची किंमत किंवा भरपाईची मागणी एक कोटीपर्यंत असेल तर आता जिल्हा ग्राहक न्याय मंचात दाद मागता येते. दरवर्षी एक ते पाच हजारांच्या वर नवी प्रकरणे दाखल होतात. प्रलंबित प्रकरणांपैकी निकाली प्रकरणांचे प्रमाण दोन टक्क्यांपर्यंतच आहे. 

एक हजाराच्या वर प्रकरणे प्रलंबितअहमदनगर (१४२५), औरंगाबाद (१०९७), हिंगोली (१६४६), जळगाव (३६६६), कोल्हापूर (१७७४), मुंबई (२३१४), नागपूर (२६०४), नांदेड (३२७५), नाशिक (१५२७), पुणे (१९७१), रायगड (२११४), सातारा (१०३५), सोलापूर (१६५१), ठाणे (२९८६), यवतमाळ (२०९२).

न्याय मंचाकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण (टक्के) -(जानेवारी ते मार्च, २०२१)हाउसिंग (४२.५६), विमा (१४.०५), बँकिंग (११.१६), इलेक्ट्रिकल (४.१३), टेलिकॉम (४.१३), ऑटोमोबाईल (३.३१), मेडिकल (२.४८), फायनान्स (२.४८), टेलिकॉम (१.६५). शिक्षण (१.६५). कृषी, वाहतूक व इतर (१२.४०). यामध्ये घरांचा दर्जा, बांधकाम साहित्याच्या वापराबाबत फसवणूक झाल्याच्या बिल्डरांविरुद्ध सर्वाधिक तक्रारी असल्याचे दिसते. 

टॅग्स :consumerग्राहकCourtन्यायालयthaneठाणेNandedनांदेड