शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

World Book Day: माहिती, अनुभव, ज्ञान, शहाणपण पुस्तकंच देतात- डॉ. आशुतोष जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:49 IST

पुस्तकांनी माणूस कसा घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा कसा विकास होतो यावर सुप्रसिद्ध लेखक, गायक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी लोकमतकडे आपली मते मांडली आहेत.

मी काय वाचतो? असा विचार जेव्हा मी करायला घेतो तेव्हा मला माझी वाचक म्हणून आणि माणूस म्हणून झालेली घडण आठवते. ही घडण साधारणपणे समांतरच असते. अगदी सुरुवातील लहानपणी मी हातात येईल ते वाचायचो. मग ते शांपूच्या पाकिटापासून कॉमिक्सपर्यंत सगळं. आताही थोडंफार तसंच आहे. पण तो काळ भाषेची समज वाढवणारा असतो, तिच्या प्रेमात पडण्याचा असतो.  हे भाषेच्या प्रेमात पडणं तुम्हाला पुस्तकांच्या वेगळ्या जगात घेऊन जातं. लिटल वूमनचं शांता शेळकेंनी अनुवादित केलेलं पुस्तक चौघीजणी हातात आलं मी सुद्धा त्या वेगळ्या जगात गेलो. आजही त्या पुस्तकाच्या प्रेमात आहे. त्यावर युटोपियाचा आरोप होत असला तरीही ते कायम आहे. त्यानंतर काळाच्या ओघात एकेक चांगली पुस्तकं माझ्या समोर येत गेली. आधी मराठीत आणि नंतर इंग्रजीत. इंग्रजीत शेक्सपिअर अभ्यासाला होताच त्यानंतर त्याची नाटकं शिकवलीही त्यामुळे तो जरा जास्त समजून घेता आला. शेक्सपिअर आणि संत ज्ञानेश्वर ही सर्वार्थानं दोन वेगळ्या लांब टोकांवरची माणसं मला एकाच वेळी आवडतात. शेक्सपिअरचं आॅथेल्लो माझ्यावर चांगलंच परिणाम करुन गेलं, तर ज्ञानेश्वर जीवनाचं सार सांगत प्रेरणा देत राहिले.माझ्या मते काही पुस्तकं फक्त माहिती देतात, काही फक्त अनुभव मांडतात, काही ज्ञान देतात तर काही शहाणपण देतात. हे सगळं वाचक म्हणून एक माणूस म्हणून आपल्यासाठी आवश्यक वाटतं. सर्वच महत्त्वाचं वाटतं. निखळ विनोद, कॉमिक्स वाचायला माझा आजही आजिबात नकार नसतो. विनोदी साहित्य हे काहीतरी साधं आणि अमूक प्रकारची पुस्तकं म्हणजे चांगली असं मी मानत नाही. चांगला विनोद निर्माण करणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि विनोदाचे बारकावे समजून ते वाचता येणं वाचक म्हणून तितकंच अवघड आहे. त्यामुळे श्रेष्ठ-कनिष्ठ असं त्यात मानू नये. मला वाटतं पुस्तकांनं माणसं घडतात तशी अगदीच कधीतरी बिघडतातही. जेव्हा आपण नवे वाचक असतो तेव्हा लेखकामुळे, भाषेमुळे, विचारांमुळे प्रभावित होतो. कालांतराने त्याच्या वाचनाची, विचारांची व्याप्ती वाढली की तो तुलना करायला लागतो. वास्तवदर्शी पुस्तकं, कादंबरी यातील त्याला हवं ते निवडू लागतो. पुस्तक वाचताना आपण त्यातील पात्रांपेक्षा वेगळे आहोत, आपलं जगणं वेगळं आहे हे त्याच्या लक्षात येतं. कधी तो त्यातील संवेदना स्वत:च्या व्यक्तीमत्त्वात रुजवतो किंवा कधी ती निर्धाराने बाजूलाही ठेवतो.  माझी एक मैत्रिण सांगते की ती पुस्तक वाचताना काही दिवस त्यातलीच एक होऊन जाते, ही  सुरुवातीची अवस्था काहीकाळानंतर दूर होते. किंवा वाचन आणि पुस्तकंच आपल्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करुन देतात. त्यामुळे मला वाचनामुळं घडणं एक सुंदर आनंददायी प्रवास वाटतो.

(डॉ. आशुतोष जावडेकर यांची मुळारंभ, लयपश्चिमा, नवे सूर अन् नवे तराणे ही पुस्तक प्रसिद्ध आहेत).

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिन