शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने लस, निधी देऊनही राज्य सरकारचे काम संथच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 08:17 IST

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार; धोका लक्षात घेऊन गती वाढवा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना लस, औषधांसह वाढीव निधीही दिला आहे. त्यामुळे आता राज्याने काम करण्याची गरज आहे. सध्या राज्य सरकारचे काम संथगतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करत आहे. परंतु, राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रॉनबाबत मंगळवारी मंत्री भारती पवार यांनी सह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना कळविले होते; पण ते आले नाहीत. अधिकारी आले आणि आम्ही आढावा घेतला, सूचना केल्या. आता राज्यांनी अंमलबजावणी करावी, असे सांगून भारती पवार म्हणाल्या की, सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावेत, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. 

यासंदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवी. प्रत्येक राज्यातील स्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष आहे. प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे.  केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यातील आरोग्य सचिवांसोबत  चर्चा करत आहेत, असेदेखील डॉ. भारती पवार म्हणाल्या.

मदत मिळत नसल्यास मंत्र्यांनी लेखी कळवावेकेंद्र सरकारकडून आवश्यक मदत दिली जात नसल्याचे आरोप डॉ. भारती पवार यांनी यावेळी फेटाळून लावले. केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य योजनेशिवायही निधी मंजूर केला आहे. सर्वच बाबतीत केंद्र सरकारने राज्याला मदत दिलेली आहे. त्यामुळे जर कोणी मंत्री मदत मिळत नसल्याचे विधान करत असतील तर त्यांनी तसे लेखी कळवावे. जेणेकरून आम्ही काय दिले नाही ते तरी आम्हाला कळेल; पण केंद्राने जे दिले त्याचे काय झाले, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर येतो, असेही पवार यावेळी म्हणाल्या.

राज्यभरात १७० निवासी डॉक्टर कोरोनाबाधितnमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील रुग्णालयांमधील मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढा, या मागणीसाठी सुरू असलेला सेंट्रल मार्ड या निवासी संघटनेचा संप मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर सोमवारी संपला, मात्र आता मंगळवारी राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सेंट्रल मार्डने दिली आहे.nपालिका रुग्णालयात आणि जम्बो कोरोना केंद्रांमध्ये मिळून ६० आरोग्य कर्मचारी, पॅरा वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. पालिका क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.nनिवासी डॉक्टरांवर कामाचा मोठा ताण आहे. निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने कॊरोनाग्रस्त होत आहेत. अशा वेळेस त्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याऐवजी त्यांच्यावरील कामाचा भार, कामाच्या वेळेत बदल करत वाढवण्यात येत असल्याचे म्हणत निवासी डॉक्टरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या