शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समृद्धी महामार्गावरील सर्वात रुंद देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्गाचं काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:25 IST

समृद्धी महामार्गामधील सर्वात रुंद आणि देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्गाचं काम पूर्ण

नागपूर -  मुंबई - नागपूर शहराला जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ७०१ किमीचा २४ जिल्ह्यातून जात असून तो १६ पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. त्यातील, वर्धा येथे पॅकेज- २ चं काम प्रकल्प कालावधी आधीच पूर्ण करण्यात आले आहे. अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने पेव्हमेंट क्वालिटी कॉंक्रिट (PQC) पूर्ण करणारी पहिली कंपंनी ठरली आहे. पॅकेज-१४ मध्ये इगतपुरी येथील दुहेरी बोगदे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले आहेत.  

वर्धा येथील खडकी आमगाव ते  पिंपळगाव या ५८.४ किमी या पॅकेज २ चे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या पट्ट्यात १० दशलक्ष क्यूबिक मीटर ओपन टेकडी कटिंग, दोन वन्यजीव उन्नत मार्ग, एक रोटरी आणि दोन इंटरचेंज, १८ दशलक्ष क्यूबिक मीटर मातीकाम, छोटे आणि मोठे पुल आणि असंख्य स्टील स्ट्रक्चर्सची उभारणी या कामांचा समावेश पॅकेज दोन मध्ये आहे. 

अ‍ॅफकॉन्सचे पॅकेज 2 चे प्रकल्प नियंत्रक कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, आम्हाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या चांगल्या पाठिंब्यामुळे आम्हाला कोविड महामारी असतानाही अंमलबजावणीची गती वाढवता आली. आम्ही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भूकामासाठी एक उत्कृष्ट टीम तयार केली होती. तसेच, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव उन्नत मार्ग बांधला. बांधकामादरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा होणार नाही याची काळजी घेतली गेली कारण यामध्ये ड्रिलिंग आणि ब्लास्टिंगचा समावेश होता. आम्ही दोन्ही बाजू बॅरिकेड केल्या आणि सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेतली असं प्रकल्प व्यवस्थापक अभिजीत चक्रवर्ती यांनी सांगितले. 

समृद्धी महामार्ग पॅकेज - 2 ची महत्त्वपूर्ण माहिती व ठळक वैशिष्ट्ये • खडकी आमगाव ते वर्धा जिल्ह्यातील पिंपळगावपर्यंत ५८.४ किमी विस्तार• प्रकल्प कालावधी आधी पूर्ण होणारे समृद्धी महामार्गाचे पहिले पॅकेज• १५० किलोमीटर प्रतितास गती (डिझाईन स्पीड)• २०० पेक्षा जास्त बांधकामे• ५३ बॉक्स कल्व्हर्ट, २५ लहान पूल, १९ वाहनासाठी भुयारी मार्ग, १२ पादचारी भूमिगत मार्ग, ११ फ्लायओव्हर, पाच मोठे पूल, दोन रेल्वे ओव्हर ब्रिज, दोन वन्यजीव उन्नतमार्ग, दोन वन्यजीव भूमिगत मार्ग• समृद्धी महामार्गामधील सर्वात रुंद आणि देशातील पहिला वन्यजीव उन्नत मार्ग• १२ किमी ओपन हिल कटिंग• वर्धा नदीवरील ३१५ मीटर लांबीचा प्रमुख पूल १४ महिन्यांत पूर्ण• वर्धा नदीवर स्टीलचा वापर करून बो स्ट्रिंग ब्रीज बांधला

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग