शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मुंबई-बडोदा महामार्गाचे काम जानेवारीपासून सुरू

By admin | Updated: September 14, 2016 06:16 IST

मुंबई-बडोदा या ३५० किलोमीटर लांबीच्या आणि १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचे काम १ जानेवारी २०१७ पासून सुरू होणार असून २०१९ पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल

मुंबई : मुंबई-बडोदा या ३५० किलोमीटर लांबीच्या आणि १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचे काम १ जानेवारी २०१७ पासून सुरू होणार असून २०१९ पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये केली. यावेळी त्यांनी देशाच्या विकासाचा ‘रोड’मॅपच सादर केला.उद्योग, राजकारण आणि प्रशासनातील दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प, त्यातील अडचणी, उपाययोजना आणि भविष्य या विषयावर दिवसभर सखोल चिंतन झाले. महाराष्ट्राची वेगवान प्रगती साधण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले विविध घटक या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. दिवसभर चाललेल्या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमत मीडियाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा, येस बँकेचे अध्यक्ष संजय पालवे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर, जेएसडब्ल्यूचे सीईओ कॅप्टन बीव्हीजेके शर्मा आणि ‘टॉपवर्थ’चे अध्यक्ष अभय लोढा आदी उपस्थित होते. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी कॉन्क्लेव्हच्या आयोजनामागील लोकमतची भूमिका स्पष्ट केली. गडकरी यांचे भाषण म्हणजे स्वप्ननगरीची जणू सोनेरी सफरच! अत्यंत प्रभावीपणे पण तेवढ्याच प्रामाणिकपणे त्यांनी केलेले भाषण सगळ्यांनीच उत्स्फूर्तपणे स्वीकारले. कोणताही कागद हातात न धरता देशभरात कुठे, किती लांबीचे आणि किती खर्चाचे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत, किती प्रकल्प येऊ घातले आहेत याची सगळी आकडेवारी गडकरी यांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे सादर केली. मुंबई-गोवा महामार्गाचे सिमेंट काँक्रिटचे चौपदरीकरण १२ हजार कोटी रुपये खर्चून २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल.नागपूर-बुटीबोरी ते रत्नागिरी असा विकासाचा महामार्ग १२ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तुम्ही हे लिहून ठेवा...कोट्यवधींचे रस्ते वाहतुकीपेक्षा जलवाहतुकीचे महत्त्व कितीतरी जास्त असेल हे सांगताना आपल्या खुमासदार शैलीत गडकरी यांनी देशाच्या वाहतूक विकासाचा भव्यदिव्य आराखडा समोर ठेवत उपस्थितांना स्वप्ननगरीत नेऊन ठेवले. त्याचेवळी, मी दिलेला हा शब्द आहे आणि तो मी पूर्ण करणारच हे तुम्ही लिहून ठेवा,असा शब्ददेखील दिला. मुंबई-वडोदा महामार्गाची घोषणा लोकमतच्या व्यासपीठावरुन करताना आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की हा मार्ग पुढे अहमदाबादला जोडला जाईल. राज्याच्या विकासाचे नवे दालन या निमित्ताने उघडले जाईल. आळंदी, पंढरपूर, देहू, गाणगापूर, तुळजापूरसह विविध धार्मिक व पर्यटनस्थळे महामार्गाने जोडण्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. पंढरपूरच्या पालखीच्या मार्गावर वारकऱ्यांसाठी थांबण्याच्या जागा, व इतर सुविधा उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. इंदूर-मनमाड रेल्वेमार्गाचे काम चालू वर्षाअखेर सुरू करण्यात येईल. त्यात ५० टक्के निधी हा रेल्वे खात्याचा तर उर्वरित निधी हा आपल्या विभागाचा असेल, असे गडकरी यांनी जाहीर केले. मनमाड-कसारा मार्गे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत मालाची वाहतूक केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ------------ - ---------- मी दिल्लीत महाराष्ट्राचा अ‍ॅम्बेसडरविकासाबाबत राज्यातील कोणत्याही भागावर अन्याय केला जाणार नाही, असा शब्द देऊन गडकरी म्हणाले की चौफेर विकास हेच माझे आणि मुख्यमंत्र्यांचेदेखील लक्ष्य आहे. मी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा अ‍ॅम्बेसडर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे गडकर म्हणाले. ------------ अच्छे दिन’ आमच्यासाठी ‘गले की हड्डी’!माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी अनिवासी भारतीयांच्या एका परिषदेत ‘अच्छे दिन आने को अभी वक्त लगेगा’ असे विधान केले होते. त्यावर,‘अच्छे दिन आनेवाले है’ असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तेव्हापासून ‘अच्छे दिन’ ही आमच्यासाठी ‘गले की हड्डी’ बनली आहे, अशा शब्दात गडकरी यांनी ‘अच्छे दिन’वरून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपला देश अतृप्त आत्म्यांचा समुद्रच आहे. लोकांकडे सायकल असेल तर त्यांना मोटरसायकल हवी असते आणि ती आली की चारचाकी पाहिजे असते. ‘अच्छे दिन’ हे आपल्या समाधानावर अवलंबून असते, असे ते म्हणाले. --------------- नितीन गडकरींच्या भाषणातून...सध्या ९७ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. ते २ लाख किलोमीटरर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात पावणेतीन लाख किमीपर्यंत जाईल. रस्ते, सागरी वाहतूक, बंदर विकास यावर २५ लाख कोटी रुपये खर्च करणार. रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार. येत्या तीन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण किमान निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य. त्यासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च करणार. सरकार ही द्रौपदीची थाळी आहे. आमच्याकडे निधीची कमतरता नाही. विकासाबाबत राजकीय इच्छाशक्ती व दूरदृष्टी आणि प्रशासनाचे सहकार्य असेल तर गतिमान विकास होईल.