शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

कौतुकास्पद! बोली भाषांचे बोट धरून माय मराठीला समृद्ध करणारा धनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:58 IST

भटक्या विमुक्त समाजातील ८० विद्यार्थ्यांना स्वत:च्याच भाषेत भेटल्या कविता

- शिवराज बिचेवार नांदेड : माय मराठी जगली पाहिजे आणि विस्तारलीही पाहिजे, हे आता बोलून गुळगुळीत झालं आहे. पण, कमळेवाडीतील भटक्या-विमुक्तांच्या आयुष्यात ज्ञानप्रकाश पोहोचविणाऱ्या शाळेत माय मराठीला समृद्ध करणारा धनी राबतोय. शिवाजी अंबुलगेकर या ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने बोली भाषांचे बोट धरून मराठीला वंचितांपर्यंत पोहोेचलंय.मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे भटक्या-विमुक्त समाजातील ८० विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा उभी आहे. ५ वी ते १२ पर्यंत निवासी शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी आहे़ या शाळेत उपलब्ध बोलीभाषेतील शब्दांच्या आधारे कवितांचे भाषांतर करण्यात येते़ या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेसोबतच मराठीचीही गोडी वाटू लागली़ शब्दसंग्रहातही वाढ झाली. ७ वीच्या पुस्तकातील शशिकांत शिंदे यांच्या माणुसपण गारठलंय या कवितेचा गोरमाटी अनुवाद बंडू जाधव या विद्यार्थ्याने केला.आंगाड्या कसो पाळीरो काळचार मिना रेतो तोहारोगार रानू देकनमणक्या खुशीमं हासतो तोअशाप्रकारे ५ वी ते १२ वी पर्यंतच्या अनेक कवितांची गोरमाटी, अहिराणी, वडार, कानडी, हिंदी, पारधी भाषेत विद्यार्थ्यांनी भाषांतरे केली.फ. मु. शिंदे यांची आई ही कविता विवेक पाटील या विद्यार्थ्याने अहिराणी भाषेत अनुवादित केली.माय एक नाव राहसघरमा नि घरमागजबजलेले गाव राहसबठासमा राहस तबय जानवस नयीआते नयी कोठेच तरी बीनही म्हणवस नयी़बोलीभाषांचे शब्दकोषशाळेतील गोरमाटी, वडारी, अहिराणी, पारधी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले़ त्यांना प्रकल्प देण्यात आले़ स्वंयपाकघरातील वस्तू, शेती कामातील वस्तु, वार-महिन्यांची नावे, उद्योग अशाप्रकारचे त्यांच्या बोलीभाषेतील शब्द, त्यांचे पर्याय संग्रह करण्यास विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यातून बोलीभाषेतील शब्दकोषाची संकल्पना आकाराला आली. जाती-जमातींच्या बोली लिखित स्वरुपात कधीच आल्या नाहीत. त्या केवळ मौखिक होत्या़ परंतु विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बोलीभाषेचा शब्दसंग्रह तयार झाला आहे.अंबुलगेकर भरवितात विविध प्रयोगांची ‘शाळा’या ठिकाणी गोरमाटी, कैकाडी, वडार, वासुदेव, पारधी, मसनजोगी यासारख्या जातीतील विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगवेगळी आहे़ त्यामुळे प्रमाण मराठीतील शिक्षण त्यांच्या आकलनास येत नाही़ ही बाब शिक्षक शिवाजी अंबुलगेकर यांनी हेरली़ त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यास त्यांनी सुरुवात केली़ त्यातूनच मराठी कविता बोलीभाषेत अनुवादित करण्याची कल्पना त्यांना सुचली़ मराठी कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ लिहून देताना त्या शब्दांना बोलीभाषेतील पर्यायी शब्द शोधून दिले.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य