शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

अद्भुत, आश्चर्यजनक अन् नयनरम्य...! समृद्धी महामार्गावरचा हा चौक डोळे दिपवणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 06:45 IST

चारही बाजूंनी हिरवळ, बगीचा आणि एक अद्भुत दृश्य येथे दिसणार आहे. सेल्फ इल्युमिनेटिंग लाईट्सच्या बळावर चौक रंगही बदलेल.

कमल शर्मा

नागपूर - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या शिवमडका एंट्री पॉईंटचे दृश्य मनोहारी झाले आहे. येथे जवळपास ७०६८५ चौरस मीटरच्या परिसरात गोल आकाराचा चौक साकारला आहे.

चारही बाजूंनी हिरवळ, बगीचा आणि एक अद्भुत दृश्य येथे दिसणार आहे. सेल्फ इल्युमिनेटिंग लाईट्सच्या बळावर चौक रंगही बदलेल. कधी गुलाबी, निळा, तर कधी पिवळा, हिरवा, पांढरा आणि केशरी असे अनेक रंग डोळ्यांसमोर येतील आणि सर्वांना मोहिनी घालतील.     हा चौक तयार करण्यासाठी १६.३७ कोटी रुपये खर्च आला आहे. येथे पामसोबतच खजुराचे लांब वृक्ष दुरूनच आकर्षित करतील. सायकसची झाडेही आपली छटा पसरविताना दिसतील.

नागपूरजवळील हा चौक विजेच्या खर्चाच्या बाबतीत आत्मनिर्भर राहणार आहे. त्यासाठी येथे सोलर ट्रीचा उपयोग करण्यात आला आहे. सोलर ट्री अशी रचना आहे, ज्याला एका वृक्षासारखी डिझाईन केली आहे. त्याच्या शाखा स्टीलच्या आहेत. त्यावर सूर्यप्रकाशापासून वीज तयार करण्यासाठी पॅनल लावण्यात आले आहेत. (छाया : राजेश टिकले)

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग