शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला आयोगाची सायबर समिती! आज होणार पहिली बैठक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:37 IST

सोशल मीडियात महिलांना लक्ष्य करून केली जाणारी शेरेबाजी तसेच त्यांच्या बदनामीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीची स्थापना केली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई -  सोशल मीडियात महिलांना लक्ष्य करून केली जाणारी शेरेबाजी तसेच त्यांच्या बदनामीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीची स्थापना केली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.या सायबर समितीच्या माध्यमातून महिलांना लक्ष्य करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास केला जाईल व अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने राज्य सरकारला शिफारशी करण्यात येतील.सोशल मीडियावर महिलांची बदनामी करणे, त्यांना त्रास देणे, मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये व टिप्पणी करण्याच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही काळात वाढत आहे. त्यामुळे समिती स्थापून सरकारला शिफारसी करून, असे प्रकार रोखण्याची गरज होती, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.समितीच्या अध्यक्षस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह असतील. सदस्य म्हणून महिला बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद, पोलीस उपायुक्तडॉ. रश्मी करंदीकर, सायबर सिक्युरिटीचा अभ्यास असलेले वकील अ‍ॅड. प्रशांत माळी, अ‍ॅड. वैशाली भागवत, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेवर काम करणाऱ्या सोनाली पाटणकर, मुक्त पत्रकार व लेखिका मुक्ता चैतन्य यांचाही समावेश आहे. कालांतराने समितीत आणखी काही पोलीस अधिकारी, तज्ज्ञांचा समावेश करण्यात येईल.अभ्यासपूर्ण अहवाल तयार करणारसमितीच्या बैठका नियमितपणे घेऊन समितीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून, तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सादर केला जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :WomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या