शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘अंबाबाई’ गाभाऱ्यात महिलांचा प्रवेश

By admin | Updated: April 12, 2016 02:02 IST

गेल्या आठ दिवसांपासून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाला सोमवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. प्रातिनिधीक स्वरूपात विविध

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाला सोमवारी सायंकाळी पूर्णविराम मिळाला. प्रातिनिधीक स्वरूपात विविध संघटनांच्या सात महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करून अंबाबाईची ओटी भरली व स्त्री-पुरुष समानतेच्या परंपरेचे दर्शन घडविले. परंतु महिलांचा गाभाऱ्यातील प्रवेश हा सोमवारी एक दिवसापुरताच असून कायमस्वरुपी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार का, याबद्दल मात्र संभ्रमावस्था आहे. रोज सकाळी ७ ते ८ या वेळेतच फक्त महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे.कोल्हापुरातील विठ्ठल मंदिर आणि जुना राजवाडा पोलिस ठाणे याठिकाणी स्त्री-पुरुष समता समिती, अंबाबाई भक्त मंडळ आणि टोलविरोधी कृती समिती यांच्यात सोमवारी सुमारे पाच तासांत झालेल्या तीन बैठकानंतर अखेर प्रातिनिधीक स्वरूपात विविध संघटनांच्या दहा महिलांना अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास संबंधित महिला मंदिराच्या आवारात दाखल झाल्या. त्यांनी शनिमंदिराजवळील प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर संबंधित महिलांपैकी दोन महिला चुडीदार घालून होत्या म्हणून त्यांना वगळून अन्य सात महिलांना ५ वाजून २२ मिनिटांनी गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. त्यांनी अंबाबाईची ओटी भरून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी ‘शाहू-फुले-आंबेडकरांचा विजय असो’, ‘स्त्री-पुरुष समानतेचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. यावेळी सतीशचंद्र कांबळे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, सुरेश जरग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चुडीदार म्हणून विरोध..एकाबाजूला महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो म्हणून आनंद व्यक्त होत असताना पुन्हा महिलांच्या कपड्यावरून त्यांना या प्रवेशापासून रोखण्यात आले. डॉ. मीनल जाधव, अरुणा माळी यांनी चुडीदार घातला होता. साडी नेसली नसल्यामुळे तुम्हाला गाभाऱ्यात जाता येणार नाही, अशी भूमिका घेत त्यांना रोखण्यात आले. या महिलांनी केला प्रवेशसीमा पाटील (अंधश्रद्धा निर्मूलन समिती),स्नेहल कांबळे, (भारतीय महिला फेडरेशन), आरती रेडेकर (आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन), सुवर्णा तळेकर (लाल निशाण पक्ष लेनिनवादी), दीपा पाटील, वैशाली महाडिक (सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती), रुपाली कदम (पानसरे विचार मंच) यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत मीना चव्हाण, डॉ. मीनल जाधव, अरुणा माळी, ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे होत्या.सद्यस्थिती काय होती...?अंबाबाई मंदिरात १५ एप्रिल २०११ ला तत्कालीन मनसेचे आमदार राम कदम यांनी गाभाऱ्यात जाण्याचे आंदोलन केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनीही महिलांसह विरोध मोडून गाभाऱ्यात प्रवेश केला होता. परंतु त्यावेळीही हा प्रवेश कांही दिवसांपुरताच राहिला. पुन्हा देवीच्या गाभाऱ्याच्या चांदीच्या उंबऱ्यापर्यंतच सर्वसामान्य महिला व पुरुषांना सोडण्यात येत होते. गाभारा लहान आहे व देवीच्या अंगावर किंमती दागिने असल्याचे कारण सांगून आत जावू दिले जात नव्हते. त्याला फक्त राजघराण्यातील महिलांचाच अपवाद होता.भद्रकाली ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी कोल्हापुरात महिलांना करवीरनिवासिनी अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश देऊन येथील महिला-पुरुषांनी नवा पायंडा पाडला आहे; शिवाय कोल्हापुरात स्त्री-पुरुष समानता असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.- सीमा पाटील, अंनिसच्या कार्यकर्त्याराजर्षी शाहूंच्या करवीरनगरीमध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. काही कारणास्तव अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता पण, आता समन्वय व समझोत्याने महिलांना प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे इतरांनी आम्हाला शहाणपण शिकविण्याची गरज नाही.- सुवर्णा तळेकर, लाल निशाण पक्ष लेनिनवादी