शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी अवघडलेल्या अवस्थेत प्रवास टाळावा!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 02:11 IST

चक्क केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करून ठाणेकर नेहमीच देशाच्या सेवेसाठी तत्पर असतात, असा अभिप्राय दिल्याने त्याची देशभर चर्चा झाली. त्याबद्दल या क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांच्याशी साधलेला संवाद...

- पंकज रोडेकरकणकवलीतून कोकणकन्या एक्स्प्रेसने येताना ठाणे रेल्वेस्थानकातील वन रूपी क्लिनिकमध्ये (प्रथमोपचार केंद्र) एका २१ वर्षीय महिलेची सुखरूप प्रसूती झाली. या प्रसूतीची दखल घेऊन चक्क केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करून ठाणेकर नेहमीच देशाच्या सेवेसाठी तत्पर असतात, असा अभिप्राय दिल्याने त्याची देशभर चर्चा झाली. त्याबद्दल या क्लिनिकचे संचालकडॉ. राहुल घुले यांच्याशी साधलेला संवाद...आपण करत असलेल्या कामाची देशपातळीवर चर्चा होते, याविषयी कसे वाटते?नक्कीच ती चांगली गोष्टी आहे. तसेच ती अभिमानास्पदही आहे. त्यातून पुढील वाटचाल करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेसह प्रेरणा मिळते. अजून चांगल्या प्रकारे सेवा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल.आतापर्यंत प्रसूतीदरम्यान काही अडथळे आले का? तसेच तेकसे पार केले?ठाणे रेल्वेस्थानकात आतापर्यंत केलेल्या चारही प्रसूती सुदैवाने नॉर्मल झाल्या आहेत. त्या करताना त्यावेळी उत्तम डॉक्टर, साधने, औषधांसह निर्णय योग्य पद्धतीनेच घेतल्याने धोका किंवा कोणतीही इजा झालेली नाही. रेल्वेतील अपघातग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार करत असल्याने या प्रसूती करतानाही यश आले आहे.क्लिनिक सुरू करण्यामागचा उद्देश काय? आतापर्यंत किती रेल्वेस्थानकांवर तीसुरू झाली आहेत?आईवडिलांच्या झालेल्या अपघातातून ओढवलेल्या परिस्थितीतून क्लिनिकची संकल्पना पुढे आली. सद्य:स्थितीत, वैद्यकीयसेवा लोकांच्या खिशाबाहेर जात आहे. त्यातून ही सेवा नागरिकांच्या बजेटमध्ये यावी, या दृष्टिकोनातून खारीचा वाटा म्हणून ‘मॅजिक दिल’ या संस्थेच्या माध्यमातून वन रूपी क्लिनिक सुरू झाले आहे. मुंबई विभागातील मध्य रेल्वेवरील गर्दीच्या ११ स्थानकांवर ते सुरू आहे, तर येत्या ७ मे रोजी पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकावर ते सुरू होत आहे.रेल्वे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे?रेल्वे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्थींनुसार क्लिनिक सुरू आहेत. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जसे सहकार्य मिळत आहे, तसेच सहकार्य यापुढेही मिळावे. त्यातून जास्तीतजास्त हातभार लावाला. ही सेवा आणखी चांगल्या प्रकारे देण्यासाठी मागे पडणार नाही.गरोदर महिलांना काय सांगाल?दिलेल्या तारखेलाच प्रसूती होईल, हे सांगता येण्यासारखे नाही. ती तारीख कधी मागे किंवा पुढेही होऊ शकते.त्यामुळे या दिवसांत लांबचा प्रवास करणे शक्यतो टाळावे, तसेच जवळ असणाऱ्या रुग्णालयाचीच निवड करण्यास प्राधान्य द्यावे.अन्यथा, संबंधित महिलेसह त्या नवजात बाळाच्या जीवावर एखाद्या वेळी बेतण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अशा अवघडलेल्या अवस्थेत शक्यतो प्रवास टाळावा.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य