शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला कॉन्स्टेबल आत्महत्या प्रकरण, मुंबईच्या पोलीस शिपायाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 22:50 IST

महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल २२ दिवसांच्या चौकशीनंतर यातील सह आरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

ठाणे : महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल २२ दिवसांच्या चौकशीनंतर यातील सह आरोपी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे याला अखेर कळवा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.या आत्महत्येच्या घटनेनंतर मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे हे पसार झाले आहेत. तर फापाळे याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. त्याची तपास अधिका-यांकडून हजेरीही घेण्यात येत होती. सुभद्राचे दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने अमोल याच्यासोबत लग्न ठरले होते. ते येत्या दिवाळीमध्ये विवाहबद्ध होणार होते. त्याच संदर्भातील बोलणी करायची असल्यामुळे ६ सप्टेंबर २०१७ रोजी दोघेही जेवणासाठी तिच्या कळवा, मनीषानगर येथील घरी एकत्र बसले असतानाच निपुंगे यांचे तिच्या मोबाईलवर वारंवार फोन येत होते.वारंवार येणा-या फोनची चौकशी केल्यानंतर सुभद्राने निपुंगे यांच्याकडून होणा-या त्रासाची अमोल याला माहिती दिली. यातूनच त्यांच्यातही काहीतरी बिनसले. वादही झाला. तिच्या आत्महत्येला एसीपींच्या मानसिक छळाबरोबरच अमोलच्या वादाचीही किनार असल्याचा जबाब तिचा नवी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल भाऊ सुजीत पवार याने कळवा पोलिसांकडे नोंदविला. याच जबाबाच्या आधारे निपुंगे आणि फापाळे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. यातील मुख्य आरोपी निपुंगेंचा अटकपूर्व जामीन २५ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी फेटाळला. ते गेल्या २२ दिवसांपासून तपास पथकाला गुंगारा देत आहेत. तर सहआरोपी फापाळे याने सुरुवातीपासूनच पोलिसांना तपासामध्ये सहकार्याची भूमिका बजावली. परंतु त्याला अटक केलेली नव्हती. मात्र, आता त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.