शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूजेनिमित्त राजापुरात एकवटली नारी शक्ती, आरत्यांसह ढोल वादनातून महिलांनी स्मृतिबद्ध केली नवरात्राची एक संध्याकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 22:04 IST

‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपात असंख्य ‘ती’ जमल्या. राजापुरातील मित्रमेळा आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महिलांच्या सामुदायिक आरतीच्या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजापूर, दि. 24 - ‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपात असंख्य ‘ती’ जमल्या. राजापुरातील मित्रमेळा आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महिलांच्या सामुदायिक आरतीच्या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सुमारे दीडशेपेक्षा अधिक महिलांनी एकत्र येत विविध पारंपरिक आरत्यांची सेवा दुर्गा मातेच्या चरणी रुजू केली. सायंकाळी ७ वाजता उपस्थित महिलांच्या हस्ते देवीची धुपारती होऊन आरती जागराला सुरुवात झाली. विविध पारंपरिक आरती म्हणून श्री शिव छत्रपती आणि भारत मातेच्या आरतीने ७.४५ला आरतीची सांगता झाली. त्यानंतर राजापुरातील पहिल्या ढोल पथकाने अत्यंत दमदार आणि तालबद्ध वादन सादर करत अंबेचा गजर केला.आरतीच्या निमित्तानं अधिकाधिक महिलांना एकत्र आणण्याची कल्पना ‘लोकमत’ने मांडली आणि मित्रमेळाच्या धडपड्या सदस्यांनी ती उचलून धरत नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीही केली. मित्रमेळाचे सर्व पदाधिकारी त्यात उत्साहाने सहभागी झाले होते. विविध उपक्रमांमधून आपली स्वतंत्र ओळख करणा-या मित्रमेळाने आणखी एक उपक्रम यशस्वी केला.