शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ट्रस्टमधून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची 21 लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 15:37 IST

ठाणे: मामा भांजे दर्गा ट्रस्टचा विश्वस्त असल्याची बतावणी करीत मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्ट यांच्याकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या मानपाडा येथील महिलेची 21 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

ठाणे: मामा भांजे दर्गा ट्रस्टचा विश्वस्त असल्याची बतावणी करीत मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्ट यांच्याकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या मानपाडा येथील महिलेची 21 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.महमद सलीम खान कुलाबावाला याने या 45 वर्षीय महिलेला आपण मामा भांजे दरगाह ट्रस्टमध्ये विश्वस्त असल्याचे भासविले. त्यामुळेच मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्टमार्फत सहज बिनव्याजी कर्ज मिळवून देऊ शकतो, अशी त्यांना गळ घातली. त्यासाठी लागणारी प्रोसेसिंग, गॅरेंटर, पडताळणी तसेच इनव्हिजिलेटर फीच्या नावाखाली वेळोवेळी सलीम खान त्याचा मित्र जयदीप गोखले, शिरीष अय्यर, संजय चव्हाण, प्रमोद आणि शोभा यांनी ही महिला आणि तिचा भाऊ रमेश यांच्याकडून बँकेतून आरटीजीएसद्वारे तसेच रोखीने 21 लाखांची रक्कम घेतली. त्याबदल्यात संबंधित महिलेचे कोणत्याही प्रकारचे कर्जही त्यांनी मंजूर करून दिले नाही.एप्रिल 2015 ते 2 डिसेंबर 2017 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये ही महिला आणि तिच्या भावाकडून सलीम आणि त्याच्या साथीदारांनी हे 21 लाख रुपये उकळले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वारंवार त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र, त्यांनी पैसे किंवा कर्जही दिले नाही. अखेर याप्रकरणी 2 डिसेंबर रोजी त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक सायकर हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :thaneठाणे