शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भावाचे प्रेमसंबंध जुळवले म्हणून विवस्त्र करून महिलेची काढली धिंड, नऊ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 11:31 IST

भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना बीडमध्ये घडली आहे.

बीड, दि. 7 : भावाचे प्रेमसंबंध जुळवून आणल्याच्या संशयावरून एका महिलेला विवस्त्र करून धिंड काढल्याची संतापजनक घटना शिरूर कासार तालुक्यातील वरंगळवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात पाच महिलांसह नऊ अटक करण्यात आली आहे.मारोती रघुनाथ सटले, बबन रघुनाथ सटले, संजय आश्रुबा इंगोले, अंगद राम इंगोले, कुंता बबन इंगोले, लंका मारोती सटले, रेखा संजय इंगोले, सुरेखा बबन इंगोले व झुंबर शहादेव दाताळ अशी आरोपींची नावे आहेत. पीडित महिला, तिचा पती हे मुलासोबत वरंगळवाडी येथे राहतात. मारोती सटले यांचे ते नातेवाइकही आहेत.पीडितेच्या भावाचे आणि सटले कुटुंबातील मुलीचे प्रेमसंबंध जुळले. ही बाब समजल्यावर तिच्या आई-वडिलांनी २ आॅगस्ट रोजी दुपारी पीडितेला व तिच्या पतीला मारहाण केली होती. यावेळी पीडितेच्या पतीने माफी मागत हे प्रकरण मिटविले होते. मात्र, त्यांचा राग शांत झाला नव्हता.पीडितेचे पती शुक्रवारी शिरूर येथे गेले असता मारोतीसह अन्य आठजण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी पीडित महिलेला विवस्त्र करून चावडीपर्यंत चपलांनी मारहाण करीत तिला फरफटत नेले. पीडितेची सासू सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही नाल्यात ढकलून देण्यात आले. त्यांची मुले मोठमोठ्याने ओरडत होती, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. शिवाय, सामूहिक अत्याचार करण्याची धमकीही तिला दिली. पीडितेचे पती घरी आल्यावर हा सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.