शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची नागपुरात आत्महत्या

By admin | Updated: August 21, 2016 22:36 IST

अमेरिकेत राहणाऱ्या एका उच्चशिक्षित महिलेने नातेवाईकांच्या घरी नागपुरात येऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 21 - अमेरिकेत राहणाऱ्या एका उच्चशिक्षित महिलेने नातेवाईकांच्या घरी नागपुरात येऊन आत्महत्या केली. स्वत:चा जीव देण्यापूर्वी तिने आपल्या आठ महिन्यांच्या गोंडस चिमुकल्यालाही विहिरीत फेकून त्याचा जीव घेतला. रविवारी सकाळी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हृदयद्रावक घटना घडली. प्राजक्ता अतुल देशमुख (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, तिच्या हातून मारल्या गेलेल्या तिच्या चिमुकल्याचे नाव सर्व्हेश आहे. तिचे माहेर अमरावतीत आहे.भंडाऱ्यातील अतुल भास्कर देशमुख (वय ३५) यांच्याशी तिचा विवाह झाला होता. नोकरीच्या निमित्ताने अतुल पत्नी आणि मुलगा सर्व्हेशसह अमेरिकेतील ट्रिचसिटीत (जागरिया स्टेट) राहत होते. रविवारी रात्रीपर्यंत या प्रकरणाचे कारण स्पष्ट न झाल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी मृत प्राजक्ताविरुद्ध मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अतुल सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. तर, प्राजक्ताने एमबीए केले होते. अमेरिकेत ती हाऊस वाईफ म्हणूनच भूमिका वठवित होती. आठ महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्राजक्ता आणि अतुलने बाळाचे नाव सर्व्हेश ठेवले. अतुलची बहीण आणि जावई स्वामीधाम नगरी, बेसा, नागपूर येथे राहतात. राखी बांधून घेण्यासाठी अतुल पत्नी आणि मुलासह बहीण जावई राजेंद्र देशमुख यांच्याकडे आले होते. सर्व काही हसत खेळत झाल्यानंतर शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास प्राजक्ता घरगुती साहित्य घेऊन येते, असे सांगून चिमुकल्या सर्व्हेशला घेऊन घराबाहेर पडली. दुपार झाली तरी ती परतली नाही. तिचा मोबाईल घरीच होता. त्यामुळे तिची वाट बघण्याशिवाय कुटुंबीयांसमोर पर्याय नव्हता. दुपारचे ४ वाजले तरी प्राजक्ता परत आली नाही त्यामुळे पतीने तिच्या माहेरच्यांना तसेच अन्य नातेवाईकांना विचारणा केली. ती कुणाकडेच पोहचली नसल्याचे कळल्याने शोधाशोध सुरू केली. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे सायंकाळी अतुल आपल्या नातेवाईकांसह हुडकेश्वर ठाण्यात पोहचले. त्यांनी पत्नी प्राजक्ता मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी अन्य पोलीस ठाण्यात ही माहिती देऊन शोधाशोध सुरू केली. रात्रभर इकडे तिकडे विचारणा केल्यानंतर रविवारी सकाळी अतुल आणि त्यांचे नातेवाईक पुन्हा हुडकेश्वर ठाण्यात पोहचले. पोलिसांनी त्यांना आजूबाजूच्या विहिरीत शोधण्याचा सल्ला दिला.

... अन् काळजाचे ठोके चुकलेस्वामीधाम परिसरालगतच्या मैदानात एक विहिर आहे. देशमुख कुटुंबीयांनी सहजपणे विहिरीत डोकावले आणि त्यांच्या काळजाचे ठोके चुकले. प्राजक्ताचा मृतदेह विहिरीत तरंगत होता. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना केली. पीएसआय निलेश पुरभे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहचले. माहिती कळाल्यानंतर ठाणेदार झावरे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री राठोड यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने प्राजक्ता आणि सर्व्हेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ते पाहून अतुल आणि त्यांच्या कुटुंबीयांना जबर मानसिक आघात बसला. कारण अंधारात या विहिरीवर जाळी आहे. त्यामुळे एकाचवेळी दोघांनी वरून उडी घेणे शक्य नाही. त्यामुळे प्राजक्ताने आधी चिमुकल्या सर्व्हेशला विहिरीत फेकले आणि नंतर स्वत: उडी घेतली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला आहे. मात्र घरात सर्व व्यवस्थीत असूनही तिने गोंडस चिमुकल्यासह स्वत:ला संपविण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले त्याचे कारण स्पष्ट झाले नाही. सध्याच कोणती सुसाईड नोटही सापडली नसल्याचे पोलीस सांगतात. त्यामुळे पोलिसांनी प्राजक्तावर सर्व्हेशची हत्या करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.