शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

सेविका हसल्या, ताई रुसल्या! मुख्यमंत्र्यांनी दिली मेस्माला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:59 IST

अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्थगित केला.

मुंबई : अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना अत्यावश्यक सेवा कायद्याच्या (मेस्मा) कक्षेत आणण्याचा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्थगित केला. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाखाली सरकार झुकले, पण त्याचवेळी आपला निर्णय फिरविला गेल्याने पंकजा मुंडे मात्र कमालीच्या नाराज झाल्याचे कळते. स्थगितीमुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला, पण पंकजाताई मात्र रुसल्या.या सेविकांवरील मेस्मा रद्द करण्यासाठी शिवसेना आणि विरोधी पक्षांनी बुधवारी दोन्ही सभागृहे अक्षरश: डोक्यावर घेतली होती. आजही तोआग्रह कायम होता. त्यावर, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मेस्माला स्थगिती देण्यातयेत असल्याचे जाहीर केले. विधानपरिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिले.बाबा, आपण नसल्याचीजाणीव होतेपंकजा मुंडे यांनी बुधवारी शिवसेना आणि विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना मेस्मा कायम राहील, असे निक्षून सांगितले होते. तथापि, आज मुख्यमंत्र्यांनी मेस्माला स्थगिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवेळी पंकजा सभागृहात आल्याच नाहीत. या प्रकारानंतर पंकजा यांनी फेसबुकवर ‘बाबा! आपण नसल्याची जाणीव मला सातत्याने होत असते’ अशी अत्यंत भावनिक पोस्ट टाकली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोसह डोळे पाणावलेले बालकही त्यात दिसते.मी नाराजनाही - पंकजामुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल मी अजिबात नाराज नाही. माझ्याशी चर्चा करूनच त्यांनी निर्णय घेतला. यावरून आमच्यात कटुता आलेली नाही. माझ्या बाबांबाबत भावनिक फेसबुक पोस्ट ही मी काल रात्री टाकलेली होती. आजच्या निर्णयाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. एका मॅग्झिनने माझ्यावर विशेषांक काढला. रात्री तो वाचताना मी भावनिक झाले व ती पोस्ट टाकली. त्यामुळे आजच्या निर्णयाचा त्याच्याशी संबंध नाही. विविध बैठकांमुळे आज उपस्थित राहू शकलो नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र