बारामती : वाळूच्या वादातून वाळूमाफियांनी केलेल्या गोळीबारात दोघे जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी पाठलाग करून दोघांवर गोळीबार केला, त्यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे. आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना भिगवण येथील मदनवाडी चौकाच्या पुढे राशिन रस्त्यावर घडली. दोघांवर ५ गोळ्या हल्लेखोरांनी झाडल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला. त्यामुळे अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गोळीबारात विनोद बंडगर (रा. मदनवाडी, भिगवण), महेंद्र जगताप (रा. डाळज, ता. इंदापूर) हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. विनोद बंडगर यांची प्रकृती चिंताजनक आहे. मित्राच्या वाळूवाहतूक करणाऱ्या गाडीचा हप्ता घेऊ नये, यासाठी जखमी दोघांनी वाळूमाफियांवर दबाब आणला होता. त्यामुळे गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
वाळूमाफियांचा गोळीबार भिगवण : १ गंभीर जखमी
By admin | Updated: September 27, 2015 01:06 IST