शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

इमानचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार

By admin | Updated: February 14, 2017 03:59 IST

जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय इमान अहमदचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय इमान अहमदचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार आहे. त्यानंतर इमान स्वत: बसून जेवू शकेल. त्यानंतर इमानला पुन्हा इजिप्तला पाठविण्यात येईल, अशी माहिती सैफी रुग्णालयाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मिनिमल इनव्हेसिव्ह सर्जिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी, पत्रकार परिषदेस इमान अहमद यांची बहीण शायमा अहमद, इमानवर उपचार करणारी १३ डॉक्टरांची चमू, इजिप्त वाणिज्य दूतावासाचे अधिकारी अहमद खलील उपस्थित होते. या वेळी डॉ. लकडावाला म्हणाले की, इमानची त्वचा कठोर झाल्याने पहिल्या टप्प्यात त्यावर उपचार करण्यात येणार आहेत. साधारणत: सामान्य निरोगी व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स हे २४ एवढे असते, मात्र इमानचे बॉडी मास इंडेक्स हे २५२ आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यात येईल. तसेच, इमानची त्वचा कठोर झाल्याने पहिल्या टप्प्यात त्यावर उपचार करण्यात येणार आहेत. सध्या रुग्णालयातील आठ महिला कर्मचारी इमानची दैनंदिन काळजी घेत आहेत. इमानच्या आहाराबाबत सांगताना डॉ. लकडावाला म्हणाले की, तिला सध्या लिक्विड सप्लिमेंट्स घेण्यास सांगितले आहेत. त्यात प्रोटिन्स आणि फायबर सप्लिमेंट्सचा सुरू आहे.इमानच्या उपचारांसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या चमूमध्ये हुझैफा शेहाबी, डॉ. कमलेश बोहरा, डॉ. अबिझर मानकड, डॉ. अर्पणा भास्कर, डॉ. शेहला शेख, झोया ब्रार, डॉ. हेमल शहा, कार्लिन रेमेडिओस, डॉ. अरुण शहा, डॉ. सोनल शहा, डॉ. स्वाती कुडाळकर, डॉ. शर्मिला नायर, डॉ. राजेश शर्मा आणि डॉ. स्वाती संघवी यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पिक्चर अभी बाकी है...इमानला पुन्हा एकदा सामान्यांसारखे आयुष्य जगता यावे, हे अंतिम ध्येय आहे. तिने पुन्हा तिच्या पायावर उभे राहून फिरावे, स्वत:च्या हाताने जेवावे असे वाटते. मात्र यासाठी संघटनात्मक कार्य आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. इमानचे प्रकरण समजल्यानंतर जमेल की नाही अशी भीती होती, मात्र आता ती मुंबईत दाखल झाल्यानंतर खूप समाधानाची भावना आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आव्हान सुरू झाले असून, ‘पिक्चर अभी बाकी है,’ असे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी सांगितले.इमान सलमानची चाहतीइमान बॉलीवूडची चाहती आहे. बॉलीवूडचे सिनेमे आणि अभिनेते - अभिनेत्री तिला आवडतात. त्यातही ती सलमानची खूप चाहती आहे, त्याचे सिनेमे पाहायलाही तिला आवडतात. त्याचप्रमाणे शाहरूख आणि अमिताभ बच्चन यांचाही अभिनय तिला आवडतो. त्यामुळे आता हे सिनेमे इमानला पाहता यावेत, याची व्यवस्था करण्यात येणार आहे.११व्या वर्षी तिने शाळा सोडलीच्आपल्या वजनाच्या समस्येमुळे इमानने वयाच्या ११व्या वर्षी शाळा सोडली. गेल्या २५ वर्षांनंतर इमान पहिल्यांदाच घरातून बेरिएट्रीक सर्जरीसाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल झाली आहे. तिला बिछान्यावरून हलताही येत नाही.च्आपल्या दैनंदिन क्रियेसाठी ती पूर्णपणे आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून असते. इमानचे लहानपणापासूनच वजन हे तिच्या वयाच्या तुलनेत अधिक होते. जन्माच्या वेळीच तिचे वजन जवळपास ५ किलोच्या आसपास होते. च्स्ट्रोकमुळे इमानचा उजवा हात आणि पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तसेच तिला टाईप-२ डायबेटिस आहे. शिवाय तिला उच्च रक्तदाबाचा त्रास असून, फुप्फुसांचाही त्रास आहे.