सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : नातवाला जादूटोणा करून ठार केल्याच्या संशयावरून 40 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना सावरगाटा गावात भरचौकात 24 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6.3क् वाजता घडली़ राजेंद्र श्रवण ठाकरे असे मृताचे नाव आहे. तसेच पाथरी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.
सावरगाटा येथील मुळे परिवारातील लहान मुलाचा सात महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा मृत्यू जादूटोण्यातून झाल्याचा संशय मुळे परिवाराने घेतला होता. एवढेच नाही तर त्यामागे गावातीलच राजेंद्र ठाकरे याचा हात असल्याचा संशय त्यांना होता़ यामुळे
आरोपीचे कुटुंबिय राजेंद्रवर संतापलेलेच होते. अशातच गावात दिवाळी सणानिमीत्त गायगोदणाचा कार्यक्रम सुरू असताना चौकात आरोपीच्या कुटुंबातील सदस्यांची त्याच्यासोबत गाठ पडली.
या वेळी झालेल्या बाचाबाचीत आरोपीने बैलबंडीची उभारी काढून राजेंद्रच्या डोक्यावर वार केला. यात तो जागीच ठार झाला. (प्रतिनिधी)