शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 12:54 IST

माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही. विनापुरावे आरोप थांबले पाहिजेत अशी तीव्र भावना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. 

नागपूर -  Nagpur Winter Session ( Marathi News ) मी १० वर्षापासून माझ्या कौटुंबिक व्यवसायात नाही. माझ्या कुटुंबाचा व्यवसाय केवळ मुंबईतच नाही. माझा मुलगा जगभरात त्याचा व्यवसाय करतोय. कुणी कायदेशीर काम करून उद्योग करत पैसा कमावणे चांगले आहे की काही काम न करता घरी आरामात राहायचे ते चांगले आहे? एकही बेकायदेशीर काम माझ्या कुटुंबाकडून सुरू असेल तर मी माझा राजीनामा सादर करतो असं थेटपणे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत म्हटलं आहे. 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले. त्यानंतर लोढा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सभागृहातच कोऱ्या कागदावर राजीनामा सादर केला. या संपूर्ण घटनेने सभागृहात गोंधळ उडाला. मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, माझ्या कुटुंबाचा व्यवसाय असला हा गुन्हा आहे का? मी ३० वर्षापासून या सदनाचा सदस्य आहे. मी कधीही माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. कुटुंबात कुणी उद्योग करायचा नाही का? जर कुणी केला  आणि त्यात यशस्वी झाले म्हणून आक्षेप घ्यायचे सुरू आहे. मी अंबादास दानवेंचा व्यक्तिगत सन्मान करतो. पण आज त्यांनी सभागृहात माझ्यावर जे आरोप केले ते सिद्ध करावेत अन्यथा माझा राजीनामा घ्यावा. कुणावरही विनापुरावे आरोप करू नये अशी मी विनंती करतो असं लोढा यांनी सभागृहात सांगितले. 

त्यावर मी लोढा यांचे नाव परत घेतले आहे. पण मी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यायचे असतील तर तीदेखील माझी तयारी आहे असं अंबादास दानवेंनी उत्तर दिले.तेव्हा पुरावे असतील तर मांडा. हे काय चाललंय, कुटुंबाचा व्यवसाय आहे, मुलगा उद्योग करतो. माझ्यावर आरोप कशाला करता, आम्हीदेखील सार्वजनिक जीवनात आहोत. पुरावे द्या. तुमच्या सोयीनुसार तारीख सांगा. मी स्वत: पुरावे घ्यायला येतो. मी पारदर्शीपणे काम करतो. माझ्या खात्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार होत नाही. विनापुरावे आरोप थांबले पाहिजेत अशी तीव्र भावना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. 

उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केली मध्यस्थीविधान परिषदेत लोढा संतापलेले पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी केली. त्या म्हणाल्या की, सभागृहाच्या कामकाजातून लोढा यांचे नाव काढले. अनेकजण राजीनामे खिशात घेऊन फिरतात. परंतु लोढा यांनी खिशातून राजीनामा काढला. माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली. तुमच्या भावना प्रामाणिक असतील. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्यावे. आरोपांची शहानिशा त्या यंत्रणा करतील असं उपसभापतींनी सांगितले. तर माझ्याकडे त्यांच्या विभागाच्या काही तक्रारी आल्या त्या मी इथं मांडल्या हा गुन्हा आहे का? असा सवाल अंबादास दानवेंनी विचारला. त्याचसोबत आमचे व्यक्तिगत संबंध चांगले आहे. माझ्याकडे आलेल्या तक्रारी विरोधी पक्षनेते म्हणून मी मांडल्या असंही दानवे यांनी म्हटलं. 

अंबादास दानवेंनी केला आरोपहे सरकार सर्वसामान्यांचे नाही. मंत्रिमंडळातील मंत्री बघितले तर एकएकाचे प्रताप समोर येतात. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे बोलायचे झाले तर मुंबईत काय सुरू आहे, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात अनेक जमिनी घ्यायच्या. एक भाजपा नेते आणि मुंबईचे पालकमंत्री यांच्याशी संबंधित अनेक अवैध ठिकाणी बांधकाम आणि घरांची विक्री सुरू आहे. भाजपा उघड्या डोळ्याने हे सर्व बघतंय असं दानवेंनी सभागृहात म्हटलं. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाAmbadas Danweyअंबादास दानवेNeelam gorheनीलम गो-हे