शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

विधान परिषदेतील कोंडी सोमवारी सुटणार ?

By admin | Updated: December 12, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी विधान परिषदेत गोंधळाचे वातावरण कायम राहिले. सरकारने अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी

योगेश पांडे, नागपूरशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी विधान परिषदेत गोंधळाचे वातावरण कायम राहिले. सरकारने अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी, मगच कामकाज होईल हा विरोधकांचा पवित्रा कायम होता व हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात परिषदेत कुठलेही उल्लेखनीय काम झाले नाही. दरम्यान, सोमवारी परिषदेत निर्माण झालेली कोंडी सुटू शकते. यासंदर्भात स्वत: सभापती पुढाकार घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने सभागृहात शेतकरी कर्जमाफीचीच मागणी उचलून विरोधी पक्षांकडून गोंधळ घालण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात केवळ तीन प्रश्नांवर उपप्रश्न विचारण्याची सदस्यांना संधी मिळाली. तर या काळात एकाही लक्षवेधीवर चर्चा होऊ शकली नाही. शेतकरी कर्जमाफीवर सरकार चर्चेला तयार आहे. त्यामुळे या मुद्यावरून होणारा गदारोळ थांबावा व दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत चालावे व पहिल्या आठवड्याचा ‘बॅकलॉग’ भरून निघावा अशी विनंती सत्तापक्षातर्फे सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात सभापती स्वत: पुढाकार घेण्याची शक्यता आहे व सोमवारी त्यांच्या दालनात सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते तसेच इतर पक्षाच्या गटनेत्यांची बैठक होणार असून यात ही कोंडी दूर होईल. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनादेखील या बैठकीत बोलविण्यात येईल, अशी माहिती एका पक्षाच्या गटनेत्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली. दरम्यान, शुक्रवारीदेखील विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायमच होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. यादरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज पहिले अर्धा तास, २० मिनिटे, १५ मिनिटे, १ तास असे ४ वेळा तहकूब करण्यात आले. अखेर अशासकीय कामकाज आटोपून सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.