शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

‘त्या’ प्राध्यापकांवर कारवाई होणार का?; ५ हजारांहून अधिक प्राध्यापक झाले होते संपात सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 02:22 IST

विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी पुकारलेला संप तब्बल १६ दिवसांनंतर मागे घेण्यात आला. मात्र, आता संपात सहभागी झालेल्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या संपकरी प्राध्यापकांवर उच्च शिक्षण विभागाकडून कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई : विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांनी पुकारलेला संप तब्बल १६ दिवसांनंतर मागे घेण्यात आला. मात्र, आता संपात सहभागी झालेल्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या संपकरी प्राध्यापकांवर उच्च शिक्षण विभागाकडून कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एमफुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेने २५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पुकारलेल्या संपात अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तब्बल १६ दिवसांनंतर काही मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला. दरम्यानच्या काळात या संपाची गंभीर दखल घेत मुंबईसह राज्यातील प्राध्यापकांची बायोमेट्रिक हजेरी तपासण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले. याचा फटका पाच हजारांहून अधिक संपकरी प्राध्यापकांनाच बसणार असल्याने आंदोलनात सहभागी होऊ नका, असे आवाहनही शिक्षकांच्या काही इतर संघटनांनी केले होते. मात्र, प्राध्यापक संपावर ठाम राहिल्याने आता त्यांची हजेरी तपासून कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे. उच्च शिक्षण संचालनालयाकडून अद्याप कारवाईचे निर्देश नाहीत.गेल्या १५ ते २० वर्षांपासून प्राध्यापक विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे कारवाई न झाल्यास हे प्रकार पुढेही सुरूच राहतील, असे मत काही पालक संघटनांनी व्यक्त केले आहे.दिवस भरून काढणारप्राध्यापकांनी पुकारलेल्या १५ दिवसांच्या संपातील ३ दिवस सुट्टीचे होते. त्यातील १२ दिवसांत प्राध्यापक संपात सहभागी झाले होते. या दिवसांत विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले आहे असे उच्च शिक्षण विभागाला वाटते, त्या दिवसांसाठी विद्यापीठाने एक वेळापत्रक तयार करावे. प्राध्यापक ते दिवस भरून काढतील, असा प्रस्ताव एमफुक्टो या प्राध्यापक संघटनेने शिक्षण विभागाला दिल्याची माहिती राज्य अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रProfessorप्राध्यापक