शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी बदल्यांचे ॲप १ जूनपासून सुरू होणार? एसटीच्या वर्धापन दिनी खुशखबर मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:32 IST

एसटी महामंडळाच्या सोमवारी होणाऱ्या ७७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्मचारी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाच्या योजनांची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामध्ये या ॲप्लिकेशनचीदेखील सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या करण्यासाठी नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनचे उद्घाटन सोमवारी महामंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी महामंडळाला लागलेले शिफारशींचे दुष्टचक्र दूर होणार आहे.

एसटी महामंडळाच्या सोमवारी होणाऱ्या ७७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्मचारी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाच्या योजनांची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामध्ये या ॲप्लिकेशनचीदेखील सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. महामंडळात सध्या सुमारे ५५०० बदल्यांचे अर्ज आहेत. तर यापूर्वी ४०० पेक्षा जास्त बदल्या शिफारशींच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. नवीन ॲपमध्ये विविध निकषांनुसार बदल्या होणार असल्याने शिफारशींना महत्त्व उरणार नाही.

ॲपद्वारे बदल्या करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. ॲपद्वारे बदल्या केल्याने कुणावरही अन्याय होणार नाही. पती- पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजाराने आजारी व आपापसात बदल्या करण्यात कुठलीही अडचण नसून, या रखडलेल्या बदल्या तत्काळ करण्यात याव्यात.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी