शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 06:10 IST

पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी त्याला प्रत्यक्षात मूर्त रूप मिळणार का? ते स्वप्न वास्तवात उतरणार का? हा प्रश्न आहे.

‘शेंदूर’ फासले कुणी कुणाला?

पाकिस्तानविरोधात भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरची चर्चा अवघ्या जगभरात झाली. मात्र ठाण्यात शिंदेसेना विरुध्द उद्धवसेना यांच्यात सध्या ‘सिंदूर’ नव्हे तर ‘शेंदूर’ कोणी कोणाला लावले याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खा. राजन विचारे यांना ‘शेंदूर’ लावले आणि त्यामुळेच ते खासदार झाल्याचा दावा शिंदेसेनेने केला. दुसरीकडे तुम्ही तर काँग्रेसमध्ये जाणार होतात. पण, तिथे जाण्यापासून मी रोखले, असे सांगत खा. विचारे यांनी खा. नरेश म्हस्के यांच्यावर तोंडसुख घेतले. तसेच तुम्हाला कुणी ‘शेंदूर’ लावला हे विसरला का? असा दावाही केला. त्यामुळे ठाण्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ नव्हे तर ‘शेंदूर’ची चर्चा जोशात आहे.

हे तर पालथ्या घड्यावर पाणी...

अजित पवार गटाचे चिंतन शिबिर नुकतेच नागपुरात पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांचे कान टोचले. जिल्ह्यांचे दौरे करा, दौऱ्यावर गेले की, जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्षांना सोबत घ्या, अन्यथा खुर्ची रिकामी करा, अशा शब्दांत त्यांनी खडसावले. यानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नागपूरचा दौरा केला. पण, त्यांनी जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना भेटीची वेळही दिली नाही. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी पदाचा राजीनामा देताना ही खदखद बोलून दाखविली. तर, सूचनेनंतरही मंत्री दखल घ्यायला तयार नसतील तर शिबिरांतून काय होणार, असा प्रश्न पदाधिकारी उपस्थित करू लागले तर आश्चर्य कसले?

आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?

राजकारणात कायमस्वरूपी वैर नसतं, कायमस्वरूपी मित्रही नसतात. बीडमध्ये दीर्घकाळाचं वैर विसरून माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची हातमिळवणी झाली. उद्धव व राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा जवळ आले. अशातच अजित पवार गटाच्या चिंतन शिबिराबाहेर लागलेल्या बॅनरने आमदार, नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते. मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या या बॅनरवर ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी… साहेब-दादा-ताई तुम्ही एक व्हा!’ असा मजकूर होता. पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी त्याला प्रत्यक्षात मूर्त रूप मिळणार का? ते स्वप्न वास्तवात उतरणार का? हा प्रश्न आहे.

शाहरुख, राणीचे खास ‘बाँडिंग’ 

 अनेक चित्रपट कलाकारांचे वैयक्तिक जीवनातही खूप चांगले ‘बाँडिंग’ असते, याची प्रचिती वारंवार कार्यक्रमांमध्ये येते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही ते दिसले. शाहरुखला ‘जवान’साठी, तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॅार्वे’साठी राष्ट्रीय पुरस्काराने   गौरविण्यात आले. सोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात शाहरुख हा राणीच्या उडणाऱ्या केसांवरून हात फिरवत ते ठीक करताना दिसतो. तर राणी शाहरुखला मेडल गळ्यात घालताना मदत करताना दिसते. बॉलिवूडची काळी बाजू वारंवार दाखवणाऱ्यांना ही चपराकच म्हणावी लागेल. 

बेलापूरपट्टीचा ‘हिरा’ काळवंडला

एकेकाळी शिक्षकांचे गाव आणि बेलापूर पट्टीचे आकर्षण असलेल्या शिरवणे गावाला वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. याच गावच्या जयवंत सुतार यांनी महापौरपद भूषवले. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील हेदेखील याच गावातील रहिवासी आहेत. नवी मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या अनेक व्यक्ती या गावातील आहेत. त्यानंतरही  येथील समस्या जैसे थे कशा, असा प्रश्न आहे. त्यातच गावातील अनधिकृत लॉजिंग-बोर्डिंग विरोधात आंदोलने उभी राहतात, यश मात्र येत नाही. त्यामुळे एकेकाळच्या देखण्या गावाला लागलेले हे ग्रहण सुटेल का? हा प्रश्न आहे. 

‘या’ मागणीचा अर्थ तरी काय?

कल्याण-डोंबिवली पालिकेत २७ गावे असावीत की नसावीत, यावरून दोन्ही संघर्ष समित्यांत मतमतांतरे आहेत. दुसरीकडे १८ गावे बाहेर आणि नऊ गावे महापालिकेत याबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतर एका समितीचे पदाधिकारी या गावांमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत आग्रही आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात आयुक्त अभिनव गोयल यांच्यावर राजकीय दबाव आणल्याने संघर्ष झाल्याची चर्चा आहे. पण, एकीकडे महापालिकेत गावे नकोत, स्वतंत्र नगरपालिका हवी, अशी मागणी करायची व दुसरीकडे २७ गावांमधील कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घ्या, असा आग्रह धरायचा या परस्परविरोधी मागण्या नाहीत का? असा पडला प्रश्न आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Will Pawar family unite? Whispers of reconciliation for Maharashtra's benefit.

Web Summary : Political buzz includes Thane's 'Shendur' politics, Ajit Pawar's criticism of ministers, and calls for the Pawar family to unite. A viral video shows camaraderie between Shah Rukh and Rani. Issues plague Shirvane village, while Kalyan-Dombivali faces conflicting demands regarding village inclusion in the municipality.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे