शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नवीन समीकरणांची जादू चालेल? पवारांकडे योग्य वेळी संधी साधायचे कसब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:44 IST

दुर्धर रोगावर लीलया मात करणारे पवार आज मोदी-शाह-फडणवीस यांच्यासह शिंदे-अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत. 

एक-दोन नव्हे तर तब्बल साठ वर्षांच्या राजकीय आयुष्यात अनेक वादळे झेलण्याचा अनुभव असलेले ८३ वर्षीय दिग्गज नेते शरद पवार आता विधानसभा निवडणुकीचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. साथ सोडून गेलेल्या पुतण्याला त्यांनी लोकसभा निवडणुकीत मात दिली. त्याची पुनरावृत्ती करायला ते निघाले आहेत. दुर्धर रोगावर लीलया मात करणारे पवार आज मोदी-शाह-फडणवीस यांच्यासह शिंदे-अजित पवारांविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत. 

२०१९ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी अशा अफलातून महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारच होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. पुतण्याकडे गेलेल्या एकेकाला आपल्याकडे कौशल्याने ओढण्याचे काम सध्या ते करत आहेत. शिवाय अजित पवार सोबत आल्याने भाजपच्या ज्या नेत्यांची त्यांच्या मतदारसंघात अडचण झाली असे नेतेही त्यांच्या गळाला लागत आहेत. दुरावलेल्या राजकीय घराण्यांना ते पुन्हा एकदा जवळ करत आहेत. आपण पुन्हा सत्तेत येण्याच्या मार्गातील मुख्य अडथळा शरद पवार आहेत असेच महायुतीच्या नेत्यांना वाटत असणार. वयाची ऐंशी पार केलेला एक नेता अशी जरब निर्माण करू शकतो हीच शरद पवार या दोन शब्दांची जादू आहे. भाजपची अडचण होईल अशा राजकीय, सामाजिक समीकरणांची मांडणी शरद पवार खुबीने करत आले आहेत. 

योग्य वेळी संधी साधायचे कसब आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांची मोट बांधून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेससोबत आघाडी करून १५ वर्षे ते सत्तेत राहिले. राजकीय परिस्थितीचा नेमका अंदाज घेत चाणाक्ष राजकारण खेळायचे व योग्य वेळी योग्य संधी साधायची हे त्यांना अचूक जमते.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून स्ट्राइक रेटबाबत ते अव्वल होते. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही बड्या नेत्यांपेक्षा अनुभवाने २५ वर्षे पुढे असलेल्या शरद पवार यांची या निवडणुकीत आणि नंतर काय स्थिती असेल याबाबत उत्सुकता आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024